सकाळ मध्ये सध्या धमाल चालू आहे. मागे ३ जुलै रोजी 'आम्हाला वगळा...' हा अनंतराव भालेराव यांचा लेख जशाला तसा सकाळ च्या मुख्य अंकात आणि औरंगाबाद टुडे मध्ये दोन वेळा छापला गेला. आज पोस्ट खात्याची एक बातमी औरंगाबाद टुडेच्या पान ३ आणि पान ८ वर जशीच्या तशी छापून आली आहे. एकाच किमतीत दोन अंक न देता एकाच बातमी दोन वेळा छापण्याच्या या पत्रकारितेला काय म्हणायचे? पवार साहेब, नुसते बस थांबे रंगवून अंक विक्री वाढत नसते. अंक चांगला काढावा लागतो, मग लोक आपोआप विकत घेतात. मग १ रुपयात अंक देण्याची सुद्धा गरज उरत नाही...!

आमचा हा ब्लॉग खर्डेघाशी करणार्या समस्त बोरुबहाद्दरांना समर्पित आहे. स्थळकाळसाधनपरत्वे आम्ही तुर्तास फक्त ‘पत्रकार’ आणि ‘साहित्यिक’ या दोनच जमातींसाठी या कट्ट्यावरील जागा देण्याचे ठरविले आहे. चटकदार काही घडावे, तर ते याच जमातींमध्ये, येवढेच आमचे अनुमान ! टेक इट ईझी... वाचा, विचार करा, सोडून द्या... मनःपूर्वक फार्फार आभार...
14 जुलाई 2011
10 जुलाई 2011
औरंगाबादकराना घडले भेटीच्या `भिक`वस्तूचे दिव्य दर्शन !
औरंगाबाद्करांची मर्जी जाणून घेण्याची चढाओढ काही महिन्यापूर्वी रंगली होती. मर्जीच्या या खेळात भोपाळसेठ यांनी २०० रुपयात दिव्यदर्शनाची ऑफर देऊन वाचकांची मर्जी जिंकली. त्याच वेळी तमाम वाचकांना एक भेटवस्तू देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. दिव्य दर्शनाच्या भाराने झुकलेल्या पब्लिकने खूप रेटा सुरु केल्याने अखेर या भेटवस्तू वाटण्याचे ठरवण्यात आले.
लोकांना वाटले, कि मर्जी जाणून घ्यायला हे लोक दारोदार फिरले, मग भेट देण्यासाठी पुन्हा दारी येतील. पण हाय रे दैवा, या वेळी उलटेच घडले. दारीच काय, गल्लीत सुद्धा कोणी फिरकले नाही! समस्त गरजू भेटइच्छुकांनी आता आपल्या दारी येऊन भेट स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. तब्बल २०० रुपयांच्या भेटीसाठी आतुरलेले हजारो जीव दिव्याखाली धावले... आणि काय सांगायचे महाराजा... सर्व जण अतिशय तृप्त झाले आहेत.
भोपाळसेठ यांनी पार दूर देशीहून प्लास्टिकच्या ३ बरण्या आणि बायकांनी नाक पुसण्याचे ३ फडके असा साधारण ४० रुपयात खरेदी केलेला ऐवज आणून वाटण्यास सुरवात केली. ही मौल्यवान भीक स्वीकारण्यास सध्या दिव्याच्या अंगणात भल्यामोठ्या रांगा लागलेल्या आहेत. असली फालतू भिक स्वीकारण्यापेक्षा ती सोडून देण्याचे विचार लोक करतात पण पुन्हा - चोराची लंगोटी - म्हणून रांगेत उभे राहतात.
रांगा लागल्या पण तिथे पावसापासून संरक्षण नाही. बिचारे ४० रुपयाच्या भिकेसाठी आपला लाखमोलाचा जीव अडकवून उभे आहेत.
अशा प्रकारे वाचकांची मर्जी जाणून घेवून आता औरंगाबादेत आपलीच मर्जी चालविण्याचा प्रकार सुरु झाला असून उर्वरित महाराष्ट्रासाठी हा प्रेमाचा संदेश देण्यासाठी आम्ही हे लेखन केले आहे. यात कोणाची बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही. त्यामुळे कोणीही आम्हाला कायदेशीर इलाज करण्याचा इशारा देयू नये, ही विनंती...!
2 जुलाई 2011
‘मराठवाडा’ बुडविल्याचे पाप लोकमत ने धुतले...!
आज सकाळी सकाळी आमचे मन प्रसन्न झाले. लोकमतने आपले जुने पाप आज धुवून टाकले. साधारण दोन दशकांपूर्वी मराठवाड्यात ‘मराठवाडा’ हे दैनिक छान चालत असे. कै. अनंतराव भालेराव यांच्या नेतृत्रावाखाली चालणारे हे वृत्तपत्र स्वातंत्र्यलढ्यापासून चालू होते. बाबूजींचे पत्र औरंगाबादेत आले आणि अव्यावहारिक मराठवाडा रसातळाला गेला. यांनी तिथली माणसे पळविली. बऱ्याच गमती-जमती केल्या आणि अखेर त्या दैनिकाचा श्वास थांबला.
कै. अनंतराव भालेराव हे या दैनिकाचे सर्वेसर्वा. ज्यांच्या लेखणीच्या दमावर वृत्तपत्र चालायचे असे खूप कमी पत्रकार झाले. आचार्य अत्रे, ग. वा. बेहेरे, अनंतराव भालेराव, विवेक घळसासी... अशी छोटीशी यादी तयार होते. अशा अनंतराव भालेराव यांचे समग्र लेखन २ खंडात आज प्रकाशित होते आहे.
अनंतराव हे मराठवाड्यातील पत्रकारितेतील पितामह. त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लोकमत ने आज पहिल्या पानावर ३ कोलम बातमी छापली आहे. एवढेच नवे, तर आतील पानावर व्यंकटेश केसरी यांचा अर्धे पान लेखही चपला आहे. हे सारे गोड धक्का देणारे आहे. पण एक विचार मनात येतो – हे पापक्षालन तर नव्हे? काहीही असो, पहिल्या नंबरच्या पेपरने असे छापणे आनंददायी आहे. पण हा ‘डीएम’ इफेक्ट तर नव्हे? काहीही असो, एका महान पत्रकाराला एवढी प्रसिद्धी देत त्यांनी दिलेल्या मान वंदनेला आम्ही दाद देतो.
या उलट मराठवाड्यात आपल्या दिव्याच्या प्रकाशाचा उजेड पडण्यासाठी आलेल्या पत्राने या वृत्ताला एका कोपऱ्यातली जागा दिली आहे. अनंतराव भालेराव यांना न ओळखणारी पिढी या पत्रात नोकरी करते आहे, असे दिसते. खरे तर पत्रकारितेतील प्रत्येकाने जे ग्रंथ विकत घेउन पारायणे करून काही शिकावे, अशा योग्यतेचा हा पत्रकार. त्यांच्याकडे असे दुर्लक्ष्य! हरी हरी. तरी एक बरे, त्यांचा निवासी संपादक एके काळी मराठवाडा दैनिकात काम करीत होता म्हणे...!
मग दिव्याने या बातमीवर प्रकाश का टाकला नाही बरे? काय भोपाळसेठ? आपण तर पगार भरपूर दिले आहेत म्हणे? या विषयात कुणाची काही अपेक्षा होती का? असे चीन्धीचोर आपल्याकडे आहेत का? तपास करा.
आणि, ही आहे दिव्याच्या प्रकाशातील इवलीशी बातमी.
अनंतराव हे मराठवाड्यातील पत्रकारितेतील पितामह. त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लोकमत ने आज पहिल्या पानावर ३ कोलम बातमी छापली आहे. एवढेच नवे, तर आतील पानावर व्यंकटेश केसरी यांचा अर्धे पान लेखही छापला आहे. हे सारे गोड धक्का देणारे आहे. पण एक विचार मनात येतो – हे पापक्षालन तर नव्हे? काहीही असो, पहिल्या नंबरच्या पेपरने असे छापणे आनंददायी आहे. पण हा ‘डीएम’ इफेक्ट तर नव्हे? काहीही असो, एका महान पत्रकाराला एवढी प्रसिद्धी देत त्यांनी दिलेल्या मान वंदनेला आम्ही दाद देतो.
या उलट मराठवाड्यात आपल्या दिव्याच्या प्रकाशाचा उजेड पडण्यासाठी आलेल्या पत्राने या वृत्ताला एका कोपऱ्यातली जागा दिली आहे. अनंतराव भालेराव यांना न ओळखणारी पिढी या पत्रात नोकरी करते आहे, असे दिसते. खरे तर पत्रकारितेतील प्रत्येकाने जे ग्रंथ विकत घेउन पारायणे करून काही शिकावे, अशा योग्यतेचा हा पत्रकार. त्यांच्याकडे असे दुर्लक्ष्य! हरी हरी. तरी एक बरे, त्यांचा निवासी संपादक एके काळी मराठवाडा दैनिकात काम करीत होता म्हणे...!
मग दिव्याने या बातमीवर प्रकाश का टाकला नाही बरे? काय भोपाळसेठ? आपण तर पगार भरपूर दिले आहेत म्हणे? या विषयात कुणाची काही अपेक्षा होती का? असे चीन्धीचोर आपल्याकडे आहेत का? तपास करा.
1 जुलाई 2011
बावचळलेल्या मालकाची वेठबिगारीची 'ऑफर'!
जेहत्ते काळाचे ठाई महाराष्ट्र देशी मराठी वृत्त सृष्टीमध्ये बहुत बावचळलेपणा भरलेला दिसतो आहे. भोपाळशेठ यांच्या अमराठी आक्रमणापुढे साऱ्या मराठी पुत्रांनी नांगी टाकली. ट्रायल भूमी औरंगाबाद मध्ये जबरदस्त मुसंडी मारून आता दिव्य प्रकाश साऱ्या महाराष्ट्र देशी पसरणार आहे. या प्रकाशात उजळून निघण्यासाठी नारदाचे वंशज सरसावले आहेत. याला कोणाही मालकाचे बंदे अपवाद नाहीत. ये कारणे, काळ्या पांढऱ्या दाढीमुळे औरंगाबादेत प्रचंड मोठे खिंडार पडल्याने त्रस्त झालेल्या मालकांनी शनिवारवाड्याच्या पाठीमागून एक मनोरंजक फर्मान काढले असल्याचे कळते. त्यांनी दिलेल्या या वेठबिगारीच्या ऑफरमुले पुण्यापासून नागपूरपर्यंत आनंदी आनंद पसरल्याचे वृत्त आहे. काय आहे या मध्ये? -
ऐका...
नवी पगारवाढ मिळण्याआधी कर्मचाऱ्यांनी एक करार करणे आवश्यक आहे. या नुसार तीन वर्षे आमचा पेपर सोडून कुट्ठे कुट्ठे जायचे नाही. (आम्ही नाही जा !) समजा, जायचेच झाले तर ३ महिन्याची नोटीस द्यायची. (कित्ती मज्जा) नाही तर ३ महिन्याचा पगार कापणार! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे - बाहेर जायचे तर जा पण प्रतिस्पर्ध्याकडे जायचे नाही !!!! आता प्रतिस्पर्धी कोण, हे यात स्पष्ट नाही! प्रत्येक पेपर प्रतिस्पर्धी ठरू शकतो! मग काय? - मर मेल्या उपाशी!
साम्प्रतला समस्त उभ्या महाराष्ट्रात या नव्या वेठबिगारीची चर्चा चालू आहे. पगारवाढीआधी करारावर सही हवी, पण पगारवाढ किती, हे गुलदस्त्यात आहे. तीन वर्षे सोडायचे नाही, पण तीन वर्षे किती पगार वाढवणार, हे सांगणार नाही... काय करावे? कुठे जावे?
पत्रकारांवरील या 'हल्ल्या'विरुद्ध कोणी आवाज उठविणार का हो एस. एम. सर?
सदस्यता लें
संदेश (Atom)