28 अप्रैल 2011

उडदामाजी तांबे-ठाले.... कोणा निवडावे न कळे....!

फुकट्यांच्या विश्व साहित्य संमेलनास 
मॉरिशसकरांचा स्पष्ट नकार...!
साहित्याच्या प्रांगणात फुकट्यांची गर्दी प्राचीन काळपासून होत आलेली आहे. पत्रकार अधिक फुकटे की साहित्यिक, या विषयाच्या मुळाशी गेलो तरी नेमके वास्तव हाती येणे कठिण. पण पत्रकारांच्या फुकटेपणाला नावे ठेवली जातात आणि साहित्यिकांच्या फुकटेपणाला मराठी सारस्वताची सेवा म्हणून गणले जाते, हा मोठा दैवदुर्विलास आहे.

परमादरणीय कौतिकरावजी ठालेपाटील साहेबांच्या औद्धर्त्यामुळे मराठी साहित्य विश्व साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अखेर जागतिक पातळीवर पोहोचले. तेव्हा त्यांचेवर काय कठोर टीका झाली होती महाराजा... विचारता सोय नाही. त्यामुळे ते साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदावरून जाताच मायमराठी पुन्हा आपल्या महाराष्ट्रदेशी आपले मन रमवील, अशी अपेक्षा होती, पण आदरणीय ऊषा तांबे बाई पण झाशीच्या राणींच्याच वंशज निघाल्या. त्यांनीही आपला घोडा भारताच्या सीमेवरून मॉरिशसच्या भूमीवर उधळत नेण्याचे मनसुबे बाळगले. पण हाय रे दैवा... याआधी मनोहर जोशींच्या काळात भव्य आयोजन करणार्‍या जाम परिषदेच्या मॉरिशस मंडळाने या वेळी मात्र चक्क स्पष्ट शब्दांत आपला नकार कळविला म्हणे. काय करतील बिचारे?

अखिल भारतीय म्हणविणार्‍या मंडळातून मराठी साहित्यात फारशी उठाठेव न करणारे आणि मराठी साहित्य विश्वात नसत्या उठाठेवी करणारे शंभर-पन्नास जणांचे टोळके परदेशात जाऊन आयोजकांच्या गळ्यात पडते. त्यांच्या खर्चाने परदेशी ट्रिप काढण्याची हौस पूर्ण करून घेते, ओकून होईपर्यंत प्याले रिचविते आणि वरून आयोजकांनाच अक्कल शिकविते! मागच्या वर्षीची ही नाटके आठवून बहुधा मॉरिशसकरांनी या सारस्वतांना अद्दल घडविण्याचे ठरविले असेल.

गंमत म्हणजे ठाल्यांच्या कल्पनेला इतर सर्व साहित्य संघांचा तात्विक विरोध होता. पण तेव्हा हा विरोध का झाला असावा, याची कल्पना आता येऊ लागली आहे. ठाल्यांच्या यादीत वर्णी लागू न शकणार्‍यांचा हा गलका होता. आता आपापली तिकीटे पक्की होणार हे दिसताच सर्वांना परदेश प्रवासाचे स्वप्न पडू लागले. मॉरिशसच्या रम्य वातावरणात फुकटात चार दिवस ऐय्याशी करण्याची स्वप्ने पाहणार्‍या सारस्वतांना जमिनीवर उतरावे लागले. आता म्हणे सिंगापूरच्या गळ्यात पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

काय ही दरिद्री धडपड? अरे हिंमत असेल तर स्वखर्चाने जाऊन मॉरिशस - सिंगापूर पाहा ना... खर्च किती येतो? लाखभरात सगळी ट्रिप होते. मग कशाला मराठी दारिद्‌—याची लक्तरे जागतिक वेशीवर मांडता? सार्‍या महाराष्ट्राची बेअब्रु करता ? ठाल्यांनी गाय मारली म्हणून हे आता वासरू मारायला निघाले आहेत...!


मराठी साहित्यिकांनो,
आम्हाला तुमची कीव येते. आम्हाला तुमची कीव येते... आम्हाला तुमची कीव येते...!

27 अप्रैल 2011

लपविल्यास तू फुटक्या काचा...

समस्त पत्रकार बांधव आणि सलिल कुलकर्णी यांना सप्रेम जयभीम...

(’लपविलास तू हिरवा चाफा’च्या चालीवर...)
लपविल्यास तू फुटक्या काचा,
‘काच’ तयाचा लपेल का?
पुस्तक ऐसे खपेल का?

सन्माननीय सलीलजी कुलकर्णी यांसी,
बोरुबहाद्दराचा सप्रेम जयभीम.
बोरुबहाद्दराचे वर्तमान सुरू झाले त्यास आता दोन - तीन महिने लोटले. प्रारंभीच कबूल केल्यानुसार पत्रकार आणिक साहित्यिक हे दोनच प्राणी आमच्या रडारवर आहेत कारण काही चटकदार घडावे ते यांच्याच आयुष्यात. या आयुष्यावर काही बोलण्यासाठीच आम्ही आमचा बोरू पारजला. एव्हडे दिवस आम्ही आमच्या पत्रकार बंधूंवर लक्ष केंद्रित केले आणि आज प्रथमच आम्ही आमच्या साहित्यिक जमातीवर आमचा बोरू पारजणार आहोत आणि त्यातील पहिला मान मिळविला आहे आमचे - आपले सन्माननीय आवडते डॉक्टर गवई सलिल. आयुष्यावर बोलून बोलून त्यांचा घसा सुकला म्हणून त्यांनी लेखणी झिजविली आणि यांच्या ‘फुटक्या काचा’ सगळ्यांच्या पायात घुसू लागल्या. साहित्यावर लेखनाचा आमचा पहिला मान आम्ही त्यांस देत आहोत. त्याबद्दल त्यांनी अस्मादिकांचे आभार मानायला हवेत. आता त्यांचे पुस्तक लवकर खपेल. (हे ’खपेल’ आम्ही चांगल्या अर्थाने म्हणत आहोत!)
...................
मात्र तिकडे वळण्याआधी थोडी साफसफाई आमच्या ज्ञातीबांधवांची... आमचा बोरू टोकदार आहे. आम्हास त्याचा अभिमान आहे. हा बोरू गुदगुल्या करण्यासाठी नाही तर जायबंदी करण्यासाठीच आहे. पण आम्ही उगाच कुणालाही जायबंदी करणार नाही. कारण आमचे धोरण पक्के आहे. आम्ही ‘आहे रे’च्या वर्गाविरुद्ध आहोत. सामान्य पत्रकारांची पिळवणूक करून त्यांच्या जिवावर मजा मारणारे संपादक खात्यातील वरिष्ठ  लोक आणि मालक प्रवर्गातील लोक प्रामुख्याने आमच्या रडारवर आहेत. त्यांना आम्ही झोडपणार. मात्र सगळीकडून पिळला जाणारा श्रमिक पत्रकार आमच्यासाठी लोभाचा विषय आहे. त्यामुळे त्यांचे भले व्हावे, यासाठी आमच्या लेखणीची तलवार त्यांच्यासाठी मात्र ढालीचे रुप घेईल... काळजी करु नये.

सांप्रतला पत्रकारितेत नव्या संधी उपलब्ध होत आहेत. मुळात हे क्षेत्र टिचभर. इथे काही म्हणता काही लपत नाही. त्यामुळे, नव्या ठिकाणी जाऊन चार पैसे जास्त कमावण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना आमचे संरक्षण आहे. त्यांची नावे आम्ही कधीही जगजाहीर केलेली नाहीत. आजवर मालकांनी त्यांनी अक्षरशः लुटले... त्यांचे रक्त शोषून घेतले... त्यांना यानिमित्ताने चार पैसे जास्ती मिळत असतील, तर आमचा त्याला पाठिंबा आहे. त्यामुळे कोण कुठे जात आहे, जाणार आहे, प्रयत्न चालू आहे या संबंधी आम्ही कधीही बोलणार नाही... लिहीणार नाही. मग ते रिक्षात बसोन जावोत की टांग्यात... आणि मराठीतून हिंदीत जावोत की हिंदीतून मराठीत... बिनधास्त जा. थेटरात जाऊन फुकट नाटके बघायची आहेत.. तर जरूर बघा. नाहीतरी अख्खा नाट्यमहोत्सव फुकटच होता. आयोजक गृहस्थांनी तरी कुठे स्वतःच्या खिशातून पैसा ओतला होता? आयोजनाचा खर्च इतरांच्या गळ्यात मारून स्वतः प्रतिष्ठा कमवायची आणि उरलेला पैसाही गाठीला मारायचा, ही त्यांची खोड जुनी आहे. सहा वर्षांच्या आमदारकीनंतर झालेल्या पराभवानेही ते शहाणे झालेले दिसत नाहीत. दोन-तीन वर्षांवर आलेल्या पदवीधरच्या तयारीला ते लागलेले दिसतात. त्यामुळे अशा फुकट्यांकडून फुकटात तिकिटे मिळविणे हा बिलकुल गुन्हा नाही. आम्ही अशा बायकी चहाड्या लावणार नाही.

मात्र, आमच्या समस्त पत्रकार बंधू-भगिनींची पिळवणूक करणारा मालक असो की त्यांच्या ऑफिसातील ‘बॉस’, त्याला मात्र आम्ही सोडणार नाही. उदाहरणार्थ - आमचे मुंबईतील भाद्रपदप्रेमी अश्विनीकुमार डोंगरधारी... यांनी किती जणांचे नुकसान केले आहे? सर्व पापाचे माप त्यांच्या पदरात आम्ही घालणारच. वास्तविक, पत्रकारांनी आपापल्या योग्यतेप्रमाणे पगार मिळवावेत... गरजेप्रमाणे क्राईम, महापालिकेतील हप्तेही घ्यावेत पण हे हप्ते घेताना त्या मिंधेपणापोटी समाजाचे मोठे नुकसान तर होत नाही ना, याची काळजी अवश्य घ्यावी. सध्या नोकरी सोडून जाण्याचा, बदलण्याचा जमाना आहे. सोडून जाणाराचे जे देणे असेल ते मालक वर्गाने निमूटपणे देऊन टाकावे. अन्यथा... असो. आम्हीही एकेकाळी याच अनुभवातून गेलो आहोत. त्यामुळे अशी खबरबात असते. कोणास काही अडचणी असतील, तर बिनधास्त आम्हास मेल पाठवा. आम्ही संबंधितांना सरळ करू... त्या विषयी योग्य गुप्तताही पाळली जाईल. असो... सध्या या विषयी येवढे पुरे...!
........................
तर मूळ मुद्दा सलील कुलकर्णी यांच्या काचांबद्दलचा. त्यांच्या लेखनाचे भंगार आता सुंदर वेष्टणातून रसिकांसमोर येत आहे. फेसबुकवर तर सध्या त्यांच्या कौतिकाला फेस आला आहे. आपल्या स्वरमयी दुनियेतून या बाबाला इकडे का यावेसे वाटले, तेच कळत नाही. आधी लोकसत्ता आणि नंतर सकाळच्या वाचकांना त्यांनी दोन वर्षे वेठीला धरले. एवढ्या प्रदीर्घ लेखनातून हाती आलेल्या चमकदार गोष्टी किती? दोन -चारच... इतर सगळ्या काचा हातात खुपल्या, पायात घुसल्या, डोळ्यात शिरल्या, ह्रदयाला लागल्या... पण काय सांगणार? कुणाला सांगणार? 


 हे असे का होते? संदीप खरेने कविता लिहाव्यात आणि दोघांनी मिळून त्या गाऊन पैसे कमवावेत... एवढे पुरेसे आहे. बरे, ‘झी मराठी’ वाल्यांच्या दाढ्या खाजवून खाजवून, प्रोड्यूसरला मस्का मारून ‘सारेगमप’वर परीक्षक म्हणून वर्णी लावून घेतल्यानंतर आयुष्यावर बोलायची किंमत काय वाट्टेल ती वसूल करायला त्यांनी सुरवातही केली. आणि आजकाल गल्लोगल्ली एवढे लीडर झालेत आणि त्यांनी आपल्या काळ्याबाजारात एवढी कमाई करून ठेवली आहे, की वर्षाकाठी साधा नगरसेवकही करोडभर रुपये छापतो. त्यातून आयुष्यावर बोलायला दोन-चार लाख दिले तरी काळजी नाही... हे करताना बहुदा सलिलमहोदयांना वाटले असावे, की आपणही संदीपसारखे पुस्तक काढले पाहिजे. पण, संदीपच्या कविता वाचनीय असतात. सुसह्य असतात. आता यांनाही गायक म्हणून मिळणार्‍या मानाबरोबरच नायक होण्याची गरज भासू लागली. मग यांनी काय करावे? त्यांनी चक्क काही संपादकांनाच पटवले आणि झाला सुरू रतीब. मर्जीतली मंडळी कौतुकच करतील ना... त्यांनी कौतिक केले आणि यांना हरभर्‍याचे झाडच मोठे वाटू लागले. पण सामान्य वाचकांचे काय? त्या काचांचा किती त्रास या वाचकांनी सहन केला...!

देवाने गोड गळा दिलेला. त्यामुळे मेडिकल कॉलेजची एक जागा वाया घालवून हे महाराज लागले गाण्याच्या धंद्याला... त्याऐवजी सिरियसली डॉक्टरकी करणार्‍याला ती जागा देऊन तेव्हाच गायला सुरवात केली असती तर? त्या बिचार्‍या एखाद्याचे आयुष्य मार्गाला लागले असते. त्या वर्षी मेडिकलला वेटिंगवर राहिलेल्या त्या विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्याला प्रतिक्रिया विचारली पाहिजे... त्याच्या शिव्याशापाने कदाचित यांना थोडीही ‘...‘ वाटली, तरीही पुरेसे आहे... (‘...‘ हा सभ्य शब्द नाही.)

असो. तर आम्ही हे पुस्तक छापण्याआधीच वाचले होते. पाहिले होते. त्याआधी हे लेखन दैनिकांतूनही वाचले होते. आपले अपत्य आणि आपले पुस्तक प्रत्येकालाच प्रिय असते. पण म्हणून दोन दोन वेळा बारसे? ते ही झाले. पहिले आपल्या गणेश कला क्रिडा मध्ये... फुकट गाणे ऐकण्यास मिळणार म्हणून पब्लिकनेही गर्दी केली... पण प्रत्येकाने आपली कुवत ओळखली पाहिजे, असे आम्हास वाटते. ‘मी पहाटे तीन वाजता लिहिण्यास सुरवात केली...’ अशी थाप मारली की लोक भुलतात...! मनातला संवाद म्हणून टिंबाटिंबांनी ओळी जोडल्या की नवी ‘शैली’ तयार होते... असो. कोळसा तरी किती उगाळावा... कोळशानेही कधीतरी आत्मपरीक्षण केले पाहिजे एवढेच आमचे म्हणणे आहे...

साहित्यिक स्नेहमेळाव्यावर निमंत्रकाचाच बहिष्कार...!

17 फुल्ल, 3 हाफ साहित्यिक 
आणि 93 जणांचा गोतावळा...

अखेर होऊ नये तेच घडले. याचीच चिंता मागचे काही दिवस आम्हाला लागून राहिली होती. मराठवाड्यातील साहित्यिकांचा स्नेहमेळावा आयोजित केल्याची खबर लोकमतातून बाहेर आली, तेव्हाच आमच्या काळजाचा ठोका चुकला होता. तब्बल 29 वर्षे ज्या घडीची वाट समस्त मराठवाड्याने पाहिली, ती घडी अशी समोर आल्यानंतर खरे तर मन आनंदाने फुलून यावयास हवे होते... आपलेच खरे करणार्‍या ग्रुपने अखेर कधीतरी समाजात मिसळण्याची कृती करण्याचे मनावर घेतल्यानंतर खरे तर सर्वांना आनंद व्हावयास हवा होता... पण असे काही घडले नाही... मनात पाल चुकचुकणे, काळेबेरे मनात येणे, फट्‌ म्हणता ब्रह्महत्या, हात दाखवून अवलक्षण या आणि असा प्रकारच्या मराठी साहित्यविश्वातील असंख्य म्हणी आमच्या मनात येत गेल्या... हा प्रसंग लोकमतावर का बरे ओढवला...?

एका भास्कर ग्रुपने यांच्या तोंडाला फेस आणला आहे. त्यामुळे आठवून आठवून एकेकाला बोलावणे सुरू आहे ऐसे आम्ही ऐकून आहोत. हा प्रसंग त्यातीलच एक. त्या ग्रुपने अख्ख्या मराठवाड्यात जबरदस्त जाळे विणले आहे. औरंगाबाद शहरात तर त्यांनी पोहचण्याला एकही घर सोडले नाही. साहित्यिक वगैरे जमातींना तर ताजमध्ये बोलावून जेवण घातले आणि सोमरसही पाजला. भास्कर उगवताच लोकमतालाही जाग येऊ लागली आणि 29 वर्षांत प्रथमच साहित्यिकांना लोकमतात सन्मानाने निमंत्रित करण्यात आले. काय हा दैवदुर्विलास...! अख्ख्या महाराष्ट्राला सर्वाधिक खपविणार्‍या, सॉरी सर्वाधिक प्रती खपणार्‍या दैनिकाच्या हेडक्वार्टरमध्ये सध्या एकच हलकल्लोळ माजला आहे. त्या कल्लोळातून साहित्यिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

आधी आम्हास वाटले, की हा महामेळावा महाभव्य असेल. ताज - रामा - अजिंठा अम्बॅसडरमध्ये असेल. संध्याकाळी असेल. रात्रीपर्यंत चालेल. ‘विचारां’बरोबरच ‘आचारां’ची देवाणघेवाण होईल. पण शेठजी फार दूरदृष्टीचा माणूस. प्रिंटिंग मशीन हलविण्यानंतर रिकाम्या झालेल्या शेडमध्ये खुर्च्या मांडून तिथेच महामेळाव्याची सज्जता केली आणि तिथेच पाठीमागे, टॉयलेटच्या बाजूला धुळीच्या साम्राज्यात केटररच्या बल्लवकलेला जागा देण्यात आली. काय हे...? हा काय साहित्यिकांना खुष करण्याचा मार्ग झाला? या मार्गाने तर पेपर टाकणारी पोरंही खुश होणार नाहीत. त्यामुळे घडलेही तसेच. स्टेजवरील आणि स्टेजखालील साहित्यिके मोजल्यास तब्बल 17 फुल्ल साहित्यिक भरले. तीन हाफ (म्हणजे स्वतःला साहित्यिक म्हणवून घेणारे) सुद्धा होते. उरलेली खोगीरभरती कॉलेज विद्यार्थ्यांची...! सगळी मिळून झाली 93...! आता घ्या. काय करायचे?

आमच्या हाती औरंगाबादेतून आलेल्या विश्वसनीय माहितीनुसार कार्यक्रमास सुरवात झाली तेव्हा सर्व वक्तेही पोहोचलेले नव्हते. दुसर्‍या सत्राचे वक्ते पहिल्या सत्रात आले नव्हते आणि पहिल्या सत्राचे वक्ते दुपारी निघून गेले ! मंचाच्या पाठीमागे लावलेल्या पडद्यावर कॉंग्रेसचे निडणूक चिन्ह ‘हात’ वेगवेगळ्या अँगलमध्ये फिरवून लावण्यात आले होते आणि कोपर्‍यात ‘लोकमत नॉलेज फोरम’ चा लोगो छापलेला होता. हे नाव ‘लोकमत ज्ञान मंच’ असे करावे, असे या मराठी मंडळींना वाटले नाही...! आदरणीय करणजी दर्डा हे या ‘फोरम’च्या स्थापनेची घोषणा करणार, असे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात ते या ‘दीड दमडी’च्या साहित्यिकांकडे फिरकलेही नाहीत! कदाचित अचानक ते लॉंग ड्राईव्हवर गेले असावेत. या भव्य मंचावर आदरणीय मोठ्या बाबुजींची तसबीर होती. या तसबिरीसमोर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. साहित्याच्या प्रांगणात, साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रथमच होत असलेल्या या भव्य मेळाव्यात ज्ञानदेवता माता सरस्वतीची तसबीर किंवा मूर्ती किंवा अस्तित्वही कुठे नव्हते...! साक्षात मराठी सारस्वतांच्या महामेळाव्यात, सरस्वतीच्या दरबारात सरस्वतीची ही अवहेलना...! याच साठी का मराठवाड्याने 29 वर्षे वाट पाहिली?

साहित्यिकांना पहिल्यांदाच बोलावले तर काही आदर सत्कार करायचा... आम्हाला प्रत्यक्षदर्शीकडून कळलेल्या माहितीनुसार, झाडाखाली मांडलेल्या एका टेबलसमोर लायनीत उभे करून सर्वांना नावे नोंदविण्याचे फर्मान सोडण्यात आले आणि नावे नोंदविणार्‍याला प्रवेशाचे ‘कीट’ वाटून टाकले. यातच महामेळाव्याचे स्मृतिचिन्हही होते. काय हा अपमान? सारस्वतांना स्मृतिचिन्हं अशी एका रांगेत उभी करून वाटायची असतात? प्लास्टिक फोल्डर - 2 रुपये, पेन - 1 रुपया, रायटिंग पॅड - 2 रुपये, स्मृतिचिन्ह - 25 रुपये, गळ्यात लटकविण्याचे लोकमतच्या नावाचे मंगळसूत्र - 3 रुपये आणि नाश्ता - चहा - जेवणाचे 75 रुपये असे प्रत्येकी 108 रुपयांच्या घाऊक दरात साहित्यिकांना पटविण्याचा लोकमताचा प्रयत्न अखेर फसला. मराठवाड्याने त्यांना आता 29 वर्षांनी ओळखले आहे ! त्यामुळेच परगावचे काही मोजके अपवाद वगळल्यास फारसे कोणी तिकडे फिरकले नाही.

खरे सांगायचे, तर महाराष्ट्रात मोठ्या तयारीनिशी उतरणार्‍या भास्कर ग्रुपच्या आगमनाची प्रचंड धास्ती शेठजींनी घेतली आहे. मध्यंतरी सगळ्या स्टाफशी त्यांनी वन-टू-वन चर्चा केली. काहींचे पगार वाढले. पण सिनियर तसेच कोरडे राहिले. खुद्द मॅनेजरही नाराज होऊन सोडून निघून गेले. जुन्या काळप्रमाणे आवळा देऊन कोहळा काढण्याचा सध्या शेठजींचा प्रयत्न सुरू आहे. पण लोक आता शहाणे झाले आहेत. मग ते कर्मचारी असोत, वाचक असोत की साहित्यिक... त्यांना शेठजींचे उद्योग माहिती आहेत. त्यातच अण्णा हजारे यांना अतिथी संपादक करण्याचे या मंडळींचे नाटक भलतेच अंगलट येते आहे. हा ग्रुप असे काही दाखवितो आहे, की यांचा भ्रष्टाचाराशी मागच्या तीन पिढ्यांपासून काहीच संबंध नाही...! हे लोकांना कळत नाही, असे वाटते का? स्वातंत्र्यपूर्व काळातील खजिन्याच्या गोष्टी विचारातही घ्यायच्या नाहीत, असे ठरले तरी मागच्या इलेक्शनमध्ये किती खर्च केला आणि तो कसा वसूल करणे सुरू असते, हे समाजासमोरील उघड सत्य असते. तेव्हा बिझनेसचा प्रतिकार बिझनेसनेच केलेला चांगला असतो. भलत्या गोष्टी केल्या की मुखकमल रंगण्याची शक्यता असते.

सारा मराठवाडा आता नव्या भास्कराच्या उदयाची प्रतीक्षा करतो आहे... दिव्य मराठीकडून सद्वर्तनाची अपेक्षा करीत, त्यांना आमच्या शुभेच्छा...!

23 अप्रैल 2011

मालकहो विचार करा...

सांप्रतला सगळ्या मिडियाच्या जुन्या-जाणत्यांमध्ये एक भयंकर अस्वस्थता आम्ही पाहतो आहोत. मागची 15-20 वर्षे ही जाणती मंडळी एकाच ठिकाणी स्थिर राहिली. अत्यंत निष्ठावान लोक ! पण या निष्ठेचे कौतिक कुणाला? या मालक प्रवर्गाचे एक वैशिष्ट्य असते. सत्राशे-साठ दारे हुंगत फिरणार्‍यांना हे खास ‘फीड’ देतात आणि दारच्या निष्ठावंताची बोळवण कोरड्या हाडकांवर...! कोरडी हाडके चघळून यांच्याच ओठातून रक्त निघते आणि वर मालक म्हणतो, बघ कसा रक्ताळलेला तुकडा टाकला ! काय क्रूर विनोद. याला अपवाद कोणीच नाही.
प्रत्येक ठिकाणी अशी माणसं आम्ही वेचून काढून दाखवू शकतो. नुकतीच मिसरुड फुटलेले पोट्टे अगदी सहजपणे 40-50 हजाराचे आकडे कनवटीला लावून फिरताहेत आणि वर्षानुवर्षे घासून राहिलेली ही पांढर्‍या मिशावाली माणसं अजून 30-40 मध्येच ! काय सेठ? हीच का निष्ठेची किंमत? की नव्या बाजाराच्या नियमाप्रमाणे यांनीही दर तीन-चार वर्षांनी नवे घरोबा शोधायला सुरवात करायची?
सध्या मराठवाड्याचा विषय हॉट आहे म्हणून मराठवाड्यातली नावे घेऊ... जयंत महाजन - नुसता बोजा वाढवला पण पगाराचे काय? स. सो. खंडाळकर - नुसतेच ज्येष्ठ पत्रकार पण पगाराचे काय? चक्रधर दळवी - नुसतेच निवासी संपादक पण दिव्याच्या प्रकाशातील निवासी संपादकाच्या तुलनेत यांचा पगार किती? गणेश तुळशी - पद एक, जबाबदारी दुसरीच, कामाचा बोजा भलताच पण पद आणि पगाराचे काय? कोणत्याही जिल्हा प्रतिनिधींचा किंवा वार्ताहरांचा विषय आम्ही यात मिसळत नाही, कारण त्यांच्या पगाराचे आणि उत्पन्नाचे गणित आम्ही मांडू इच्छित नाही...!
असो, काळ बदलतो आहे. प्रत्येकाला आपली ब्रँड व्हॅल्यू कळली आहे. ही माणसे बाहेर पडू लागली तर काय होईल? बरे, ती एक-एकटी नाही जाणार... ग्रुपसह जातील... मग काय?
मालकहो विचार करा... या उन्हाळ्यात तरी चहापेक्षा रस बरा...!

22 अप्रैल 2011

कहाणी एका 'मानसिक आजारी' अशा 'प्रतिसंजय राऊत'ची...

औरंगाबादसारख्या ऐतिहासिक शहरात जन्माला आलेल्या एका बेअक्कल पण स्वतःला विचारवंत वगैरे समजणार्‍या एका 'काम'सू माणसाची मजेशीर आणि तेवढीच केविलवाणी कहाणी आज 'बातमीदार'ला प्राप्त झाली आहे. या 'काम'सूच्या 'वैचारिक गुणवत्तेचा' (?)नुकताच विनायक मेटे यांनी सत्कार केलाअर्थात त्यामुळे मेटेंच्या बुध्दीची योग्य ओळखही जगाला झाली! 
ज्या ताटात खातो त्याच ताटात घाण करून आनंद साजरा करणारा हा माणूस खरंच सुखी होईल का.... त्याचे पंख नियतीने छाटून ठेवले आहेत, आता घे भरारी...आम्हीही ती पाहतोय... ज़ग बघेल... याला 'कलेक्टोजेनिया' नावाचा आजार आहेवस्तु चोरण्याची सवय आहेज्यांना तो गुरू मानतो त्यांच्याच खिशाला हात घातल्याचे औरंगाबादमधील तमाम वाचकांना माहित आहे. अशा मानसिक आजारी माणसाकडून आणखी काय 'विवेकी' अपेक्षा करणार म्हणा....
सविस्तर रिपोर्ट वाचा - बातमीदार ब्लॉग वर...!
http://batmeedar.blogspot.com/2011/04/blog-post_22.html

दिव्या दिव्या दीपत्कार... ट्रक उलटला, काय करणार?

‘नकटीच्या लग्नाला सत्राशे साठ विघ्ने’ अशी एक छानशी म्हण आमच्या अत्यंत बालपणी आमच्या गुरुजनांनी आमच्या कानात ओतली होती. नकटी म्हणजे काय, हे सुद्धा कळण्याचे ते वय नव्हते. तेव्हा शेजारच्या बबन्याने कोपर्‍यातल्या ठकीकडे बोट दाखवून ‘नकटी’ या शब्दाचे ‘सोदाहरण स्पष्टीकरण’ आम्हाला दिले होते. नव्या शैक्षणिक धोरणातील प्रयोगांचे महत्व तेव्हा आम्हाला कळले. पण बबन्याचे हे हस्तलाघव आमच्या आदरणीय गुरुजनांनी नजरेच्या कोपर्‍यातून पाहिले आणि त्यानंतर आम्हाला न्यूटनच्या सर्व नियमांचे ‘प्रयोगातून विज्ञान’ कळो आले. अवघ्या तीन मिनिटांत आमच्या ज्ञानाची पातळी कित्येक पटींनी वाढली !
असो. असे अनुभवसंपन्न प्रसंग आम्ही शक्यतो चारचौघांत सांगायचे टाळत आलो आहोत, पण कधी कधी जुनाट खोकल्यासारख्या अशा आठवणी उफाळून येतात आणि असे काहीतरी घडून जाते...
तर सांगायचा मुद्दा हा, की कालांतराने ‘त्या’ म्हणीचा ‘लाक्षणिक अर्थ’ आम्हाला कळो आला. नकटीच्याच काय, पत्रकारांच्या लग्नालाही सत्राशे साठ विघ्ने येतात, याचा अनुभवही दस्तुरखुद्द आम्हीच घेतला. (त्या काळी पत्रकारिता म्हणजे भिकेचे डोहाळे होते. आजच्यासारखी भोपाळसेठसारखी दैनिके तेव्हा नव्हती महाराजा... हजार - आठशेवर खर्डेघाशी करावी लागायची... मग कोणता बाप आपली पोरगी देणार? त्यामुळे पत्रकार जमात आणि नकटी या दोघांचे सुत जमत गेले. पाहा - अनेक जुन्या पत्रकारांच्या बायका शक्यतो नकट्याच असतात. असो, जुन्या जखमांवर फुंकर मारू नये म्हणतात. उगाच सल वाढतो !)
तर सांगायचा मुद्दा हा की, आमचे ऐकून भोपाळसेठ यांनी प्रेमजीत (!) यांना कामावर घेतले. (आमची कन्सल्टन्सी फी आता कुणाकडे मागायची बरे? मोठे अगरवाल की धाकटे की मधले? की आपला खांडेकरांनाच पकडू? पण ते म्हणणार - हा मॅनेजमेंटचा सब्जेक्ट आहे. माझा त्याच्याशी संबंध नाही. असो. परमजीतकडेच विचारणा केली पाहिजे. ही इज जंटलमन ! (फी मिळेपर्यंत तर नक्कीच!) तर प्रेमजीत रुजू झाले. आमच्या सल्ल्यावरून सेठनी त्यांना रुजू करून घेतले खरे पण इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात... हे गृहस्थ सकाळी निघणार्‍या दैनिकाच्या मराठवाडा आवृत्तीतील पहिल्या वितरण व्यवस्थापकाप्रमाणे तर ठरणार नाहीत ना? जाणकारांना त्याची कल्पना आहे. नवोदितांना काय सांगणार? उगाच जुन्या जखमांवर फुंकर...! तर, हे महोदय तिथे रुजू झाले खरे, पण त्यांना नव्या नोकरीचा ‘पगार’ आणि जुन्या नोकरीचे ‘पाकीट’ तर चालू नाही ना राहणार? कारण अशी पेरणी करण्याची इथल्या स्पर्धकांची खोड जुनी आहे...
असो... भोपाळसेठ आणि त्यांचे नशीब...
तर मुख्य मुद्दा हा की 1 मे रोजी बाजारपेठेत दिव्य प्रकाश फाकणार होणार असे जबरदस्त वातावरण महिन्याभरापुर्वी तयार झाले होते. मध्यंतरी उगाच वेळ लागत गेला. खरे सांगायचे तर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर, झहीर खान, युवराजसिंग, हरभजन यांच्याऐवजी स्टुअर्ट बिन्नी, रोहन गावस्कर, सुदीप त्यागी, सौरभ तिवारी, आरपी सिंग, मुरली कार्तिक, जयदेव उडाणकट, लक्ष्मीपती बालाजी अशी टीम घेऊन सशक्त संघाविरुद्ध मैदानात उतरायचे ठरले तर जिंकायची शक्यता किती? अर्थात मॅच फिक्स असेल तर गोष्ट वेगळी. तर चांगल्या खेळाडूंचा संघातला समावेश झालाच नाही, कारण कर्णधारांबद्दलच मोठी साशंकता...! मग काय करायचे? तर काठावर बसून मॅच पाहायची. अशा बदली खेळाडूंना घेऊन मॅच तरी कशी सुरू करणार? नव्या दिव्याचे गाडे टॉसपर्यंतही पोहोचेना.
अखेर टॉसचा मुहुर्त थोडा - म्हणजे दहा पंधरा दिवसांनी - पुढे ढकलला आणि पुन्हा शोधमोहीम सुरू झाली.
पण त्यातच आता आणखी एक दणका बसला आहे. पेपर छापून दिव्याचा ज्ञानप्रकाश पाडणारे अद्ययावत मशीन शेंद्‌—याच्या नव्या जागेत बसवण्याची प्रक्रिया चालू असतानाच घात झाला. भोपाळहून औरंगाबादकडे निघालेला, या मशीनरीजच्या टॉवर्स आणणारा कंटेनर महाराष्ट्र - मध्यप्रदेशच्या सीमेवर चक्क 20 फूट खोल खड्‌ड्यात कोसळला. सगळ्या टॉवर्सचा म्हणे सत्यानाश झाला. आता काय करायचे? तर एक - दीड महिना स्वस्थ बसायचे. कारण नवा टॉवर आल्याशिवाय मशीन सुरू नाही होणार आणि नवा टॉवर तातडीने येणेही शक्य नाही. आली का पंचाईत? यालाच म्हणतात ‘नकटीच्या लग्नाला सत्राशे साठ विघ्ने’.
याचाच अर्थ साधारण जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात दिव्याचा प्रकाश पडण्यास सुरवात होऊ शकेल. तोवर पावसाळा सुरू होईल. पावसाळ्यात नवा पिक्चर, नवे प्रॉडक्ट, नवी लग्ने होत नाहीत. नवा दिवा कसा पेटणार? त्याच्या वाती सर्दणार, तेलात पाणी जाणार, हवा जोराची सुटली तर दिवा विझायची भीती. आता काय? बरे, दुसर्‍या छपराखाली जाऊन दिवा पेटवायची सोयही नाही. दिवा पेटवता पेटवता त्याच शेडमध्ये भडका उडाला तर? आली का पंचाईत?
आम्हाला त्यामुळे सध्या खूप टेन्शन आले आहे. आम्हीही दोनशे रुपये भरून दरमहा 45 रुपयांत आमच्या मुलांवर चांगले संस्कार करण्यास सिद्ध झालो होतो... आता संस्कार पोस्टपोन...!

बाबूजी धीरे चलना...


आजकाल उठ सूट अण्णा हजारे यांना वेठीला धरण्याचे खूळ माजले आहे. कुणीही उठतो आणि अण्णाना पकडतो. आता हेच पहा ना... लोकमत या दैनिकाने अण्णा हजारे यांना अतिथी संपादक म्हणून २६ एप्रिलला निमंत्रित केले आहे... आता आहे कि नाही गम्मत ! लोकमत हा पेपर आहे हे कबूल. पण इतरांच्या कल्पना बिनधास्त चोरून वापरायचे स्कील त्यांच्या इतके कुणाकडेच नाही... खरे तर अतिथी संपादक ही कल्पना मुळात महाराष्ट्र टाईम्सची. खूप जुन्या काळातील. सध्या लोकसत्ता या दैनिकाने मुख्यमंत्र्यांना अतिथी संपादक म्हणून बोलावले आहे... तीच कॉपी लोकमत करीत आहे. 
पण लोकमत सारख्या दैनिकाने हे करणे योग्य आहे का? भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांनी रणशिंग फुंकलेले आहे... या लढ्यात दर्डाजी कुठे आहेत? नागपुरवाले असोत की औरंगाबादवाले... त्यांनी प्रथम आपल्या छातीवर हात ठेवून 'आपण आजवर कधीही भ्रष्टाचार केलेला नाही' असे सांगावे... म्हणजे त्यांच्या या मोहिमेचा खरेपणा लोकांना कळेल. नाही तर त्यांचे खायचे दात आणि दाखवयाचे दात लोकांना माहीत आहेतच... या नाटकाचे कुणाला कौतुक राहिलेले नाही... बाबूजी धीरे चलना...

20 अप्रैल 2011

टांग टिंग टिंगा... मिटिंगाच मिटिंगा...

सांप्रतला मर्‍हाटी वृत्तपत्रसृष्टी पार ढवळून निघाली आहे. प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने पाहतो आहे. परस्परांची नुस्तीच चढाओढ सुरू आहे. म्हणजे हा चढला की तो ओढतो- तो चढला की हा ओढतो. मग प्रत्येक जण आपापल्या मठीत परत जातो. इकडे मुंबईत समर खडस नावाचा विना काना-मात्रा वेलांटी-उकाराचा माणूस मटाच्या मठीतून दिव्याच्या प्रकाशात जात पावन झाला आणि त्यांच्या सोबत त्यांचे नेतृत्व मानणारे पाच जणही मागोमाग गेले. मुंबई ब्यूरो असा एका झटक्यात सुरू करण्यात भोपाळसेठना यश मिळून गेले. नाशकात - जळगावात सध्या सर्व्हेचे काम सुरू झाले आहे.

औरंगाबादेत मेंबरशिपने 60 हजाराचा आकडा पार केल्याचे कळते. हे बरीक जबरदस्त झाले आहे. सगळ्याच दृष्टीने मराठीत फाईव्ह स्टार पत्रकारितेचा उदय झाल्याचे सध्या दिसत आहे. नाही तर एव्हढे दिवस हालत बेकार होती ! टाईम्स - एक्स्प्रेस ग्रुपने मराठीला कायम बायप्रॉडक्ट मानले आणि लोकमत - सकाळ कधी मध्यममार्गाबाहेर पडले नाहीत. इतर सर्व जण गली मे शेर ठरले. यात एक मात्र चांगले झाले - सगळ्या मालकांच्या खिशातून पैसा बाहेर येऊ लागला. इंग्रजी जर्नालिझमच्या तोडीचे पगार मर्‍हाटी भूमिपुत्रांना मिळायला सुरवात झाली. चांगला पगार देण्याची ही इमानदारी मालकांनी आधीच दाखविली असती, तर आता झोप उडाली नसती. बरे, एवढे होऊनही अजून पीळ जाईना. त्या परमजित संधूंनी लोकमताला करोडांचा फायदा मिळवून दिला म्हणे, पण त्यांचा पगार होता 80 हजार. त्यांनी लाखभर पगार मागितला, पण मालकांनी या वाढीला नकार दिला. ऐन लढाईच्या वेळी सरसेनापतीच रिटायर हर्ट...! आता काय करणार?

तर, आता काळ बदलला आहे. सगळेच हादरले आहेत. आखीर धंदा है भाई. नवा वाटेकरू येणार तर सगळ्यांचीच झोप उडणार. आता सगळीकडे बैठकांचे सत्र सुरू झाले आहे, असे एकू येत आहे. आधी बैठका ही संघवाल्यांची मोनोपली होती. मग संघवाले सकाळमध्ये घुसल्यानंतर ती तिथली मोनोपली झाली. तिकडून ते लोण आता लोकमत आणि भास्कर ग्रुपमध्ये आल्याचे कळते. भास्करवाल्यांना तर पर्यायच नाही पण लोकमतात मात्र बरीच खळबळ माजल्याचे कळते.

या युद्धाची सुरवात औरंगाबादेतून होत असल्यामुळे सर्वांचे लक्ष तिकडे असल्याचे कळते. दस्तुरखुद्द थोरले बाबुजी सगळ्यांवर लक्ष ठेवून आहेत म्हणे. धाकटे बाबुजी आपल्या काही समभाषिकांच्या कोंडाळ्यात अडकून पडल्याने मराठी जगतात बरीच नाराजी असल्याचेही कानावर येते आहे. खरे खोटे देवाला माहिती पण नवा पेपर येणार म्हणून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तेथे सैन्याची जमवाजमव सुरू झाल्याचे कानावर येते आहे. सगळीकडची महत्वाची माणसं औरंगाबादी नेऊन बसवून बाबुजी आपला लढा देणार असल्याचेही कानावर येत आहे. पण आमच्या अल्पमतीप्रमाणे आम्हास प्रश्न असा पडतो, की बाहेरगावची ही माणसं तिथं नेऊन काय होणार? त्यांना औरंगाबादचे ओ की ठो माहिती नसेल ! मग असा फौजफाटा जमवून काय उपेग? उलट चंमतगं अशी होईल, की हे लोक आले म्हणून लोकल लोक निश्चित राहतील आणि आपण पाहुणे कलाकार म्हणून बाहेरून गेलेले हे लोक निवांत बसतील. मग आहेच - हैदोस धुल्ला...! ऋषिजी, काय चालले आहे तुमच्या राज्यात?

बाकी काहीही होवो, पण सांप्रतला मर्‍हाटवाडी साहित्यिकांना बरे दिवस आले आहेत, असे दिसते. तिकडे भास्करवाल्यांनी गटागटाने जेवायला बोलावून चर्चा सुरू केल्या आणि इकडे लोकमतानेही त्यांची स्फूर्ती घेऊन साहित्यिक मेळाव्याची घोषणा करून टाकली. साहित्यिक जमातीचे एक बरे आहे. दोन टाईम हादडायला आणि एक टाईम बडबडायला मिळाले की ही मंडळी खुश होते. जाण्यायेण्याचा खर्च मिळाल्यावर तर काय बघायचे महाराजा? आणि रात्रीच्या बैठकीची व्यवस्था झाली तर मग बघायलाच नको. तर असे हौशे गौशे नौशे लवकरच त्यांच्याकडे जमणार असे कळते आहे. हा कार्यक्रम 'रामा'त करणार की 'अजंठा'त हे मात्र माहिती नाही. 'प्रेसिडेंट पार्क' तर मागेच बंद झाले. आता काय करणार? कारण एवढे सगळे करायचे आणि केटरर लावून जेवण घालायचे, तर ते काही बरोबर नाही बाबुजी... हा काही सखी मंच नाही. हा सख्याहरींचा ‘बंच’ आहे. कमी अधिक समजून घ्यालच...!

19 अप्रैल 2011

अगरवाल सेठ, परमजित को उठाव...

तिकडे औरंगाबादी बर्‍याच हालचाली सुरू आहेत असे कळले. ‘मर्जी’ फेम परमजित लोकमतातून मुक्त होऊन पर्याय शोधता शोधता शनिवारवाड्यामागे भेटीसाठी आल्याचे कानावर आले. तिथे चांगली सुरवात पण झाली. असा कर्तबगार माणूस घ्यायचा, हे जवळपास ठरलेही म्हणे... पण हाय रे दैवा, घात झाला. तेथील काही हितचिंतकांनी लोकमताचा कौल घेण्याचे ठरविले आणि हा कौल डावा पडला. परमजितांचे घोडे तिथेच मुळेचे (की मुठेचे? कोण बरे सांगेल?) पाणी पीत थांबले. खरे तर त्यांच्या आगमनाने शनिवारवाड्यामागील बाजू उजळून निघाली असती. आम्ही ऐसे ऐकून आहोत की, श्रीमान परमजित आणिक परमादरणीय ऋषि मुनी फार जुने क्लासमेट. 11 वी सायन्सला ते एकाच बाकावर बसत. पण पुढे लोकमताचा कौल कळायचा तर केमेस्ट्रीची काय गरज ऐसे वाटून ऋषि मुनी परंपरागत कॉमर्स साईडला गेले आणि पुढे ते बी. कॉम. करण्यासाठी सिडनीहॅमला पोहोचले. इकडे परमजीतजींनी इमाने इतबारे बारावी सायन्स करोन तेथील एमआयटी नामक एका संस्थेतून इंजिनइरिंग पास केले. काही काळ काढल्यानंतर ते बर्मिंगहॅमला रवाना झाले. तेथेच नोकरी धरली आणि हातासरशी एमबीएही केले. इकडे बी. कॉम. झाल्यानंतर ऋषि मुनींनी औरंगाबाद मुक्कामीच पत्रकारितेची पदवी मिळविली. मग तयांना आणखी उच्च शिक्षणाची उबळ आली आणि ते परत सिडनीहॅमला रवाना झाले. तिथे तयांनी रितसर एमबीए केले.

तेथून परतल्यानंतर तयांचा रितसर राज्याभिषेक झाला. इकडे परमजित यांचे आदरणीय पिताश्री, औरंगाबाद नगरीचे भूतपूर्व डीवायएसपी एस. एस. संधू निवृत्त झाले होते. तयांचा भारी आग्रह पडला आणि परमजीतजी महाराष्ट्रदेशी औरंगाबाद नगरीत दाखल जाहले. तयास आता चार वर्षे लोटली. मित्रकर्तव्य म्हणोन नव्हे, तर कामाचा माणूस म्हणोन ऋषि मुनींनी तयांना आपल्या सरसेनापतीपदी विराजमान केले. विराजमान झाल्याबरोबर त्यांनी घोडा बाहेर काढला आणि हातघाईस सुरवात केली. पेपर वाटता वाटता क्रिकेटमध्ये घुसायचे ठरवून सुरू केलेली ‘एपीएल’ पहिल्या वर्षी 12 लाखाचा नफा मिळवून आवडती राणी ठरली होती. या राणीच्या अंगाखांद्यावर आणखी आलंकार चढवायचे ठरले आणि नव्या सरसेनापतींनी ही कामगिरी फत्ते करीत हा नफा काही कोटींवर नेला.

असा हा कर्तबगार माणूस शनिवारवाड्याच्या मागे आला पण हाय रे दुर्दैवा... घात झाला. हा माणूस सोबत असता तर पहिल्यांदाच औरंगाबादी खरा खुरा म्यानेजर मिळाला असता, असे ऐकीवात आहे. असेही ऐकिवात आहे की सध्या तेथ गत एक दशकापासून ‘म्यानेजर - म्यानेजर’चा खेळ केला जातो. असो. त्या म्यानेजराचे काहीही होवो, घसरणीला लागलेल्या पुणेरी ‘एमपीएल’ला या नव्या शिलेदाराने नक्कीच फायदा करून दिला असता. पण म्हणतात ना... काय म्हणतात?... असू दे...

तर असे हे परमजितसिंगजी सध्या अगरवालसेठना भेटण्याच्या प्रयत्नात असल्याचे कळले. पण अगरवाल सेठ तर संध्याकाळच्या विमानात बसून औरंगाबादेतून भुर्र निघून गेले. आता कसे? हे महाशय भास्कराच्या दिव्यात वात बनण्यास तयार असतील, तर अगरवालसेठनी तेल-पाण्याची व्यवस्था करावी. नाही तरी सध्या त्यांच्याकडे लोकलचा चांगला माणूस नाही. मुख्य विरोधकाचे छक्के-पंजे माहिती असलेला माणूस मिळाला तर?... पुढच्या वर्षी ‘डीएम प्रस्तुत एपीएल’ सुरू...? फुकट पेपर वाटण्यातील तोटा यातून भरून निघू शकेल. अगरवालसेठ विचार करा... चहापेक्षा रस बरा.....!

काय तो तमिळ देश... काय ती अम्मा... काय ते कलैग्नार... काय ते डोंगरधारी

आम्ही सध्या तमिळमय आहोत... यन्न रास्कला... अख्ख्या होल महाराष्ट्रात आमची किंमत कळली नाही पण त्या तमिळनाडूने आमचे कौशल्य जोखले आणि आम्हाला आदरपूर्वक चेन्नईत पाचारण केले. मागचे पंधरा दिवस आम्ही तमिळदेशच्या राजधानीत तळ ठोकून आहोत. थोडे-फार आजूबाजूलाही फिरून झाले पण हेडक्वार्टर चेन्नईच. काय तो रुबाब म्हणायचा तिथल्या विधानसभा निवडणुकीचा. आमच्या कार्यकौशल्याच्या कथा ऐकून साक्षात अम्मांच्या शिलेदारांनी आम्हास चेन्नईत पाचारण केले होते. पुणे ते चेन्नई आणि परत असा विमानप्रवास, चेनैतले वास्तव्य फाईव्ह स्टार हॉटेलात असा सारा सरंजाम ! आम्हाला खूपच भरून आले होते.

इथे महाराष्ट्रात आमच्या कंटेंट ऍनॅलिसिसची कुणाला किंमतच नाही हो... आधी कामे मिळवताना पळापळ, मग कामे करताना पळापळ आणि शेवटी बिले वसूल करताना पळापळ... नुसतीच पळापळ नशिबाला लागलेली. बरे एवढे करून पैसे तरी पूर्ण मिळावेत? छे हो... ‘इलेक्शनचा खर्च फार झाला, तुम्ही थोडे कमी घ्या’ असे म्हणत, निर्लज्जपणे हसत 15-20 टक्के रक्कम कमीच हाती पडायची... सालं, बिलं कमी करायला फक्त आम्हीच सापडतो... पण अम्मांचा अनुभव चांगला होता. अम्मांची भेट कधी झाली नाही पण त्यांचे विश्वासू साथीदार षण्मुगम यांनी त्यांचे उजवे हात सुब्रमण्यम यांना आमच्या तैनातीत ठेवले होते. तिथला सारा पसारा आवरून आम्ही नुकतेच पुण्यात परतलो आणि वर्तमान घेण्यास सुरवात केली.

शरीराने आम्ही इथे आलो पण मनाने तिथेच आहोत. आमच्या कामाची एक खासियत आहे. भलेही आम्ही फाईव्ह स्टारात उतरलो होतो पण तिथला प्रवास मात्र आम्ही यष्टीनेच केला... समाजात मिसळल्याशिवाय खरे प्रतिबिंब कळत नाही असे म्हणतात... (आमच्या इथल्या तमाम एडिटरांना सांगायला हवे...) तर, यष्टीने प्रवास - फाईव्ह स्टारात निवास - सल्ला मसलती आणि निष्कर्ष हा की पुढचे तमिळ सरकार अम्मा बनविणार... अगदी नक्की... लिहून देतो...

असो, पण घार हिंडते आकाशी - लक्ष तिचे पिलापाशी म्हणतात तसे आमचे झाले होते... सगळे लक्ष महाराष्ट्राकडे... आम्ही अनेकांच्या संपर्कात होतो... मुंबई - पुणे - नाशिक - कोल्हापूर - रत्नागिरी - औरंगाबाद - नागपूर - अकोला अशा सगळ्या भागांतून आमच्याशी संपर्कात असलेल्या हितचिंतकांशी आम्ही वेळ मिळेल तसा संवाद साधत होतो. आमचे धाकटे बंधू म्हणविणारे बेरकोबाही आमच्या संपर्कात होते. हा ‘बेरक्या’ की ‘बारक्या’? याला ‘बेरक्या’ या आपल्या नावाचाही अर्थ कळत नाही. फेसबुकवर कोणीतरी खरा अर्थ सांगतो आणि हा उगाच तिच्यावर डाफरतो. मराठवाड्यात आणि त्यातही ग्रामीण भागातील हीच बोंब आहे. असो, पण हा उगीच त्या कोणा रेडिओतील ‘संजय’ची तरफदारी करीत असतो. आम्ही म्हटले... ‘येत्या 1 जानेवारी 2012 ला आमची खरी ओळख सांगणार’, की हा म्हणणार - ‘मी पण’. आम्ही म्हटले : ‘वाचा, विचार करा आणि सोडून द्या... टेक इट ईझी’, की हा पण तेच म्हणणार ! काय म्हणायचे या बालबुद्धीला? पण म्हटले जाऊ द्या. खरे तर त्याची पुराव्यासहित ओळख आमच्याकडे आहे. पण... असो. तर म्हाराज, बर्‍याच बातम्या आम्हास चेन्नैमुक्कामीच कळल्या. पण ब्लॉग अपडेट करायला वेळच नव्हता...

आज पहाटेपासूनच आम्ही कामाला लागलो आहोत. सगळा बॅकलॉग भरून काढायला हवा. पण बॅकलॉग म्हटले की आम्हाला मराठवाडा आठवतो. मराठवाडा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा बॅकलॉग. अगदी स्वातंत्र्यापासूनचा. भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 1947 तर मराठवाड्याचा 17 सप्टेंबर 1948. तर अशी ही बॅकलॉगची परंपरा. पण सध्या हा बॅकलॉग भरून काढायची चढाओढ सगळीकडे लागली आहे. तिकडे भोपाळसेठ औरंगाबादी फुकट पेपर वाटायच्या तयारीला लागले आहेत तर इकडे मुंबईत एक राजकीय नेते फुकट गौरव वाटायच्या मागे लागले आहेत ! आमचे परममित्र अश्विनीकुमार डोंगरधारी या पुरस्काराने सध्या भलतेच खुशीत आलेले दिसताहेत. भीमसेनांना भारतरत्न मिळाल्यानंतरही जेवढा आनंद झाला नसेल तेवढा त्यांना या पुरस्काराने झाला आहे. साहजिक आहे. ‘अर्ज न मागवता हा पुरस्कार दिल्याने पुरस्काराचे महत्व आहे’, असे त्यांचे म्हणणे आहे. चांगली गोष्ट आहे. दर वर्षी एक पत्रकार, एक राजकीय नेता, एक समाजसेवक, एक शास्त्रज्ञ, एक कलाकार, एक असाच कोणीतरी असे सात - आठ जण असेच म्हणतात म्हणे ! पण लोकमताला त्यांची किंमत नाही. साक्षात आपला राजधानीतील आधार असलेल्या अश्विनीकुमाराला पुरस्कार (तो ही अर्ज न मागता) मिळाला पण त्यांचा फोटो नाही हो छापला. लोकमत म्हणजे खरेच फेकमत आहे... नाही का हो डोंगरधारी सर? आत्ता नाही उत्तर देणार? दुसर्‍या पेपरमध्ये गेल्यावर देणार का? ठीक आहे. आम्ही समजू शकतो...

17 अप्रैल 2011

विवेक गिरधारी यांना ‘मराठवाडा गौरव’ पुरस्कार

http://batmeedar.blogspot.com/2011/04/blog-post_4563.html
...  गिरधारी एक माणूस म्हणून नव्हे तर पत्रकार म्हणून आमच्या कौतुकास पात्र आहे. मात्र, चांगल्या पत्रकाराने, चांग़ल्या संपादकाने एक चांगला माणूस होण्याचा तसेच आपल्या विक्षिप्तपणामुळे कुणाला नाहक त्रास होणार नाही अशी काळजी घेण्याचा जरुर प्रयत्न करावा. 

8 अप्रैल 2011

बोरुबहाद्दर सर्वांचाच मित्र आहे...

बोरुबहाद्दर सर्वांचाच मित्र आहे. कोणावर वैयक्तिक टीका करणे हा आमचा उद्देश नाही. आमच्या टिंब टिंब मध्ये दम सुद्धा आहे. आमचे नाव गोपनीय ठेवणे ही आमची भूमिका आहे. आमचे नाव आम्ही १ जानेवारी २०१२ रोजी जाहीर करणारच आहोत. पण आमच्या काही वाचकांना मात्र आपली ओळख दडवून शेरेबाजी करण्याची खुमखुमी आलेली दिसते.
खरे तर त्याने निनावी मेल पाठ्वत केतकर - कुबेर यांच्या संबंधात पाठविलेले कात्रण पाहताच आम्हास त्याची ओळ्ख पटली होती. तरी आम्ही ते पत्र प्रकाशीत केले. याला दम लागतो तसेच मोठे मन सुद्धा लागते. पण त्यानेच पुन्हा एकदा निनावी मेल पाठवून कोणाची अकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही त्याला रोखले. आम्ही आमचा प्रतिक्रियांचा कॉलम बंद केला असला तरी आमचा इ मेल दिलेला आहेच. त्यावर प्रतिक्रियांचे स्वागत आहे. पण हा मेल त्यांच्या नावाने आला पाहिजे. त्यांची ओळख गुप्त ठेवण्याचे वचन आम्ही दिलेले आहेच. ते आम्ही पाळू. पण कोणाची अकारण बदनामी चालणार नाही.
’आमचा हा ब्लॉग खर्डेघाशी करणार्‍या समस्त बोरुबहाद्दरांना समर्पित आहे. स्थळकाळसाधनपरत्वे आम्ही तुर्तास फक्त ‘पत्रकार’ आणि ‘साहित्यिक’ या दोनच जमातींसाठी या कट्‌ट्यावरील जागा देण्याचे ठरविले आहे. चटकदार काही घडावे, तर ते याच जमातींमध्ये, येवढेच आमचे अनुमान ! टेक इट ईझी... वाचा, विचार करा, सोडून द्या..” ही आमची भूमीका आम्ही आधीच स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे याकडे गम्मत म्हणून पाहावे. कोणा एकाला टार्गेट करण्याचे आम्हाला कारण नाही. आम्ही प्रत्येकालाच प्रसाद देण्याचे ठरविले आहे. ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू.
त्यावर काही प्रतीवाद असेल तर अवश्य कळवा. पण स्वत:च्या इ मेल वरून. निनावी नव्हे ! बातमीदार हा ब्लॉग आमचे प्रेरणास्थान आहे. आमची लिन्क दिल्याबद्दल त्यांचे आभार...
सर्वांचाच पण कोणाचाच नसलेला -
- बोरु बहाद्दर

नागपुरी संत्री, कुबेर आणि चित्रगुप्त...!

सांप्रतला साडेतीन इंच मराठी वृत्तपत्रसृष्टीत बारा इंचाच्या हालचाली सुरू आहेत. त्याचा कानोसा घेता अक्षरशः कान किट्ट होत आहेत. तिकडे औरंगाबादी दिव्य युद्ध पेटले आहे. नगरमध्ये या युद्धाची सुरुवात होण्यासाठीचा दारुगोळा (पक्षी ः प्रचारपत्रे) छापून तयार आहेत. नाशिक - जळगावी सर्व्हेसाठी टीम निवडणे सुरू आहे तर लवकरच पुण्यानगरीत आगमन पक्के आहे. मुळावर घाव घातला तर फांद्या आपोआप खाली येतील हे थोरल्या बाजीरावांचे वचन बहुधा कोणे एके काळी भोपाळसेठनी वाचले होते. त्यामुळे औरंगाबादी जाउन लोकांच्या मताच्या मुळावर घाव घालणेचे त्यांनी नक्की केले असावे. असो. पण आज हुजूर हुकमाची पूर्ण पूर्तता (हुहुचिपुपु) करताना अस्मादिकांस दूर देशीच्या, नागपुरी प्रवीण झालेल्या संत्र्याचे दर्शन घडले. या संत्र्याच्या मूल्यमापनासाठी साक्षात कुबेराने चित्रगुप्ताचाच चार्ज घेतला आणि नागपुरी संत्री भर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कोमेजून अंबेजोगाई तालुक्यातील बरदापूर मुक्कामी परतल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे ऐशा कठिण प्रसंगी कुमारस्वामींनी आपल्या मठीत थारा न दिल्याने त्यांच्या नशिबी शेटजींचे पाय धरणे आल्याचे कळते.

त्याचे असे झाले... (ही त्यांचीच ष्टाईल)... ‘जर्नालिझम ऑफ करेज’ वास्तवात उतरविण्यासाठी अनेक पिढ्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. विंग्रजीत अरुण शौरी आणिक मराठीत पार जुन्या काळपासून गडकरी, टिकेकर, केतकर यांनी आपले बोरू झिजविले पण करेजचा फार काही विस्तार होईना. ‘करेजपूर्ण’ भाषेतील लेख वाचायचे तर हाच पेपर वाचायचा असे म्हणून लोक शेजारी जाऊन पेपर वाचायचे म्हणे. स्वतःचा पेपर स्वतः विकत घेणे ही मर्‍हाटी माणसासाठी महा कठीण बाब. तरी मुंबई - पुण्यात बरी स्थिती पण नागपुरात भारीच अवघड झाले म्हणे...

तर त्याचे असे झाले की प्रत्यक्ष कुबेरांनीच सगळीकडे झाडाझडती सुरू केली. हे केल्याबरोबर पहिल्याझूट काय झाले? तर कुमारस्वामी मठाबाहेर पडले. त्यांनी वेगळी मठी शोधली. (या मठीचे प्याकेज काही कोटींचे आहे म्हणे!) तर महाराजा, ही नवी मठी गाठल्यानंतर त्यांनी आपले जुने मित्रमंडळ जमवायला सुरवात केली. पण तिथे दाढीवाले कडमडले आणि ‘फ्रेन्ड इन नीड फ्रेन्ड इन्डिड’ या आंतरराष्ट्रीय म्हणीचा वापर स्वामींना करताच येईना...

पुढे असे झाले की साक्षात कुबेरानेच चित्रगुप्ताची डायरी हाती घेतली. कुबेराला हात दोन पण डोके महाविलक्षण. एकाच वेळी साहित्य, इतिहास, इंग्रजी, अर्थशास्त्र, राजकारण, तेल, तूप, लोणी हे सगळे विषय त्यांच्या मेंदूत एकदम फिट. आईनस्टाईनच्या मेंदूनंतर त्यांचाच मेंदू. तर या मेंदूतून खूप खूप सुपिक सुपिक आयडिया निघत जातात. अशीच एक आयडिया निघाली ‘करेज’वाल्या पत्रकारांच्या मूल्यमापनाची. हे मूल्यमापन कशाच्या जोरावर?  आजकाल बोरूबहाद्दरीला किंमतच उरली नाही हो... लै भारी लिहितो पण पेपरला फायदा होतो का? किती जाहिराती मिळाल्या? खप किती वाढला? असे काय पण काय पण प्रश्न म्हणे उपस्थित करायला या चित्रगुप्तरुपी कुबेरांनी सुरवात केली.

एका हातात चित्रगुप्ताची डायरी आणि दुसर्‍या हातात बेशरमीचा ओला फोक. मग काय महाराजा? एक नोंद वाचायची की फोक काढायचा. आता अशा फोकाला आजकाल ‘मेमो’ असे गोंडस नाव मिळाले आहे म्हणे. तर काय सांगत होतो... (असे म्हटले का आपण ज्येष्ठ झाल्यासारखे वाटते!) मागच्या दोन - तीन महिन्यात फोकाचे पाच सहा वळ पाठीवर उमटले म्हणे... खास म्हंजे आजकालच्या जमान्यात जसे पावर पॉइंटला महत्व आले आहे, तशा प्रकारे मागच्या पाच - सहा वर्षांचा रितसर ग्राफ काढून खपाचा तळाला जाणारा ग्राफ दाखवीत हे मेमो म्हणे अंगावर सोडले. हे पाहताच ‘करेज’चा ‘डिस्करेज’ झाला. आजपर्यंत फक्त ऐकवायचा रुबाब गाजवलेला. इकडं लिहून काढायचं, की तिकडं पुस्तक निघालं... मग कुठे गडकरी - मुंडे - भुजबळांना बोलाव, कुठे आणखी काही कर अशे उद्योग कोण किती सहन करणार हो?

‘शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा’ असा सुविचार आयुष्यात कधी वाचला नसल्यासारखे यांचे शब्द चौखुर उधळायचे. किती जणांची राजकीय कारकीर्द यांनी उध्वस्त केली ते त्यांनी आपल्याच पुस्तकात लिहून ठेवले आहे आणि नागपुरी संत्र्याचा रसाळपणा महाराजा किती सांगावा? काही नावे घेतली की रस ओघळायचा... पाघळायचा... उतू जायचा. या रसाचे किती पैसे झाले असा प्रश्न समोर आला की महाराजा काय सांगायचे.... तिडीक उठली. याच साठी का पत्रकारिता केली?

बरे, तसा नागपुरी संत्र्यांचा रसाळपणा उत्तम. सालं काढून टाकली की रसच रस. या रसाच्या रसाळ कथाही खूप आहेत म्हणतात. पत्रकार कसा ‘सर्वस्पर्शी’ असावा याचं हे दुष्काळी मराठवाड्यात उगवलेलं आणि विदर्भी दुष्काळात फुलेलं बेणं... (उसाच्या बियाण्याला बेणं म्हणतात हे आम्हाला ठावूक आहे. पण संत्र्यांच्या पिकातही नवे प्रयोग करण्याची आमची प्रगतीशील धडपड आपण समजून घ्यावी ही विनंती.) बरं थाट काय म्हणायचा...? संत्री, द्राक्ष मूळ रुपात किंवा रुपांतरीतर रुपात हवेच. ‘सांस तेरी मदिर मदिर जैसे रजनीगंधा...’ असे काही झाले तर उत्तमच !

तर अशा संपन्न वैदर्भीय ‘करेज’वर आकडेवारीसह फोक बरसले तेव्हा मठातील वाढलेला उष्मा काही सहन होईना. मग काय करायचे? कुमारस्वामींच्या नव्या मठीत प्रवेशाचे वांधे. तिथे आधीच दोन दाढीवाले. त्यात तिसरा म्हणजे मग उगीच कम्युनिष्टगिरीचा शिक्का बसायचा. खरे तर कोणीच कम्युनिष्ट - सोशालिष्ट नाहीत... सगळेच ‘अपॉर्च्युनिष्ट’...! पण हा रिस्क गेम स्वामींच्या पायरीवर न खेळता आल्याने मग म्हणे शेटजींना शरण जाणे आवश्यकच झाले. आता तिथे करेज वगैरेचा काही सवालच नसतो. राजा बोले. दळ हाले. आंधळे दळतात, कुत्रे पीठ खातात. यथा राजा तथा प्रजा. नाव सोनुबाई - हाती कथलाचा वाळा.... अशा अनेक म्हणींचे प्रत्यंतर येण्याची जागा म्हणजे शेटजींची पेढी. तिथे पुरवण्यांची मुनीमगिरी करायचे ठरले आहे म्हणतात.

पण महाराजा, एक लक्षात आले का? आता मागील काही वर्षांत ‘औरंगाबाद - नागपूर - मुंबई’ असा नवा महामार्ग तयार होतो आहे... या महामार्गावरील नवे प्रवासी कोण?

7 अप्रैल 2011

औरंगाबादेत ‘एमएनएस फ्रंट’ची स्थापना ः राज ठाकरे प्रमुख मार्गदर्शक

हिंदीभाषिकांच्या आक्रमणाविरुद्ध
मराठी वृत्तपत्रांची आघाडी स्थापन
औरंगाबाद, दि. 7 (आमच्या खास प्रतिनिधीकडून ) ः महाराष्ट्रात होत असलेल्या हिंदी भाषिक वृत्तपत्रांच्या आक्रमणाविरुद्ध एकवटण्याचा निर्णय आज भर दुपारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये घेण्यात आला. महाराष्ट्रातील औरंगाबाद या तिसर्‍या दर्जाच्या शहरात येऊ घातलेल्या एका हिंदी वृत्तपत्रसमूहाच्या मराठी आवृत्तीच्या निमित्तावरून हा गदारोळ उठला असून औरंगाबादमध्ये कार्यरत असलेल्या लोकमत, सकाळ, सामना आणि तरुण भारत या चार दैनिकांनी मिळून ही आघाडी उघडली आहे. ‘मराठी न्यूजपेपर सॉलिसिटेशन फ्रंट’ असे या आघाडीचे नामकरण करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या इशार्‍याकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती असा चर्चेचा सूर या वेळी व्यक्त करण्यात आला. या आघाडीच्या पुढील वाटचालीसाठी मनसे प्रमुख श्री. राज ठाकरे यांची एकतर्फी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणाही या वेळी करण्यात आली.

मध्यप्रदेशातील एका सुप्रतिष्ठित वृत्तपत्रसमूहाचा मराठवाड्यातील औरंगाबाद शहरातून मराठी वृत्तपत्र सुरू करण्याचा इरादा व्यक्त होताच साधारण सहा महिन्यांपुर्वी मराठवाड्यातील वृत्तपत्रसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. शहरात 150 मर्सिडिझची खरेदी झाल्याच्या बातमीमुळे देशभरात खळबळ उडालेली होती. या शहरात भरपूर पैसा आहे या भावनेने या ग्रुपने औरंगाबादेतून आपला सुर्योदय करण्याचे ठरविले होते. ही चाहूल लागताच लोकमतने सर्व दैनिकांमधून माणसे पळवून साठेबाजी करण्याचा एकच सपाटा लावला होता. एकाच वेळी तीन लोकमत काढता येतील एवढा अतिरिक्त भरणा त्यांच्याकडे झाला आहे. या तुलनेत शहरात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या सकाळ या वृत्तपत्राने आपल्याकडील बर्‍याचशा कर्मचार्‍यांना सहजपणे लोकमतच्या हाती लागू दिले. त्यामुळे त्यांच्याकडे मनुष्यबळाची चणचण निर्माण झाली. सामना, तरुण भारत, पुण्यनगरी, (न निघणारा) पुढारी, (संध्याकाळी निघणारा) सांजवार्ता या सर्वच दैनिकांत विविध पदांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी भास्कर ग्रुप येताच त्यांच्याकडे धाव घेतली.

माणसे इतरांना भाड्याने देता येतील का याची चाचपणी 
औरंगाबादच्या मराठी पत्रकारांनी स्वप्नातही कल्पना न केलेले आकडे भास्कर ग्रुपने मान्य करण्यास सुरवात केल्याने त्यांच्याकडील माणसांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आणि इतर दैनिके ओस पडण्याचा धोका निर्माण झाला. लोकमतचा एकही माणूस घ्यायचा नाही, हा धोरणात्मक निर्णय झाल्यामुळे या ग्रुपमधून आतापर्यंत एकही कर्मचारी तिकडे घेतला गेला नाही. मात्र इतर दैनिकांची कार्यालये ओस पडली.

या पार्श्वभूमीवर लोकमतचे ऋषि मुनी यांच्या निमंत्रणावरून सकाळचे ये पी, सामनाचे भरतमुनी आणि तरुणभारतचे कोणीतरी यांच्यात आज भर दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. लोकसत्ताच्या औरंगाबादच्या प्रतिनिधीला निमंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण प्रेमभंग झालेल्या कॉलेज तरुणाप्रमाणे त्यांची अवस्था झाल्यामुळे ‘तेरी गलियों मे ना रखेंगे कदम, आज के बाद’ हे एकच गाणे ते मागील आठवडाभर गात असल्याचे कळले. त्यांचे सहकारीदत्त म्हणून उपस्थित होण्याच्या प्रयत्नात होते पण बर्दापूरकर यांचा फोन आल्याने ते निघून गेले. त्यामुळे त्यांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना नाही घेतले तरी चालेल, त्यांचे सक्यऊलेशन आहेच तरी किती असा मुद्दा तरुणभारत वाल्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला पण स्वतःचा खप आठवल्याबरोबर ते गप्प झाले. परराज्यातून होत असलेल्या आक्रमणावर या वेळी प्रामुख्याने सर्वांनी मतप्रदर्शन केले. यानंतर या कॉनफ्रन्समध्ये महाजन, दळवी, तुळशी यांनाही सहभागी करून घेण्यात आले. टेलिफोन भवनमधून निघणार्‍या वायरवर आकडा टाकून आम्ही गुप्त कनेक्शन मिळविल्यामुळे आम्हाला ही सर्व बित्तंबातमी कळली.

या प्रसंगी गांभीर्यपूर्वक चर्चा झाली असली तरी मुख्य आग्रही होते ऋषि मुनी. एवढ्या प्रचंड प्रमाणावर माणसे घेऊन ठेवल्याने त्यांचे पगाराचे बॅलेन्सशीट बिघडत असल्याचे त्यांच्या चेहर्‍यावरून दिसत होते. मधल्या काळात पगारी वाढवून ठेवल्यामुळे तो वाढीव ताण पडलेला आहे. अशा स्थितीत आपली माणसे इतरांना भाड्याने देता येतील का ही चाचपणी करणे हा या कॉन्फरन्सचा हेतू असल्याचे लक्षात आले.

चौघांचा मिळून एकच रिपोर्टर
या पार्श्वभूमीवर - यापुढे शहरातील प्रत्येक बीटवर या चार दैनिकांचा मिळून एकच रिपोर्टर राहणार आहे. काही महत्वाच्या बीटवरून ताणतणावाची स्थिती निर्माण झाल्यास संबंधित एका रिपोर्टरने इतर तिघांच्या हप्तेबंदीची सोय संबंधितांशी सुसंवाद प्रस्थिपित करून पाहावी असे यामध्ये ठरले आहे. सर्व दैनिकांमध्ये येणारी सगळी पत्रके यापुढे एकाच ठिकाणी स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून सामनाच्या कार्यालयात ही पत्रके स्वीकारून तेथेच त्याचे संपादन व अक्षरजुळणी होईल. यामध्ये प्रत्येक ठिकाणी असलेल्या मराठीच्या वेगवेगळ्या पॅकेजचा अडथळा येऊ शकतो ही बाब श्री. महाजन यांनी दृष्टीस आणल्यानंतर श्री. ये पी यांनी तातडीने मॉड्यूलर वाल्यांना फोन लावून सर्व दैनिकांत एकसमान सॉफ्टवेअर बसवून देण्याचे सांगितले. याचे बिल सध्या सकाळ देईल आणि कालांतराने ते इतरांकडून वळते करून घेण्यात येईल असेही ठरविण्यात आले. क्राईम नोट, बाजारभाव, महापालिकेतील घडामोडी, शहरातील राजकारण या आणि अशा प्रकारच्या सर्व बातम्या सर्वच दैनिकांत सारख्याच असतात, त्यामुळे आपण ही बातमी कोठे वाचली होती हेच वाचकांना संध्याकाळी आठवत नसते. त्यांच्या या मर्जीचा कौल मानून बातम्यांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री. राज ठाकरे यांच्या इशार्‍याकडे त्याच वेळी लक्ष द्यायला हवे होते असा सूर या वेळी श्री. महाजन यांनी मांडला. त्याला श्री. ये पी यांनी खिन्न मनाने दुजोरा दिला. ऋषि मुनी सुद्धा या प्रसंगी भावनाविवश झालेले दिसले. सामनाशी संबंधित लोकांचा रुमाल नेमका याच वेळी खाली पडल्यामुळे त्यांचे चेहरे टेबलाखाली झाकले गेले. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

या प्रसंगी पुढील दिशा ठरविण्यात आली असून, वर घेतलेल्या निर्णयाबरोबरच आगामी काळात बचतीचे जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परराज्यातून येत असलेल्या वृत्तपत्राने दिलेले प्रचंड पगार हे सर्वांच्या चिंतेचे मुख्य कारण असल्याचे दिसले. एवढे दिवस छटाक (पगार) घेणार्‍यास थेट आतपाव (पगार) मिळाल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत तशाच आता आत असलेल्यांच्याही अपेक्षा वाढत आहेत. अशा वेळी काय करायचे हा पेच सर्वांसमोरच उभा असल्याचे दिसले. ये पी यांनी आपण अजिबात पगार वाढवू शकत नसल्याचे स्पष्ट करतानाच वाढवायचेच असले तर किती वाढवावे लागतील याचा कानोसा घेतला. ऋषि मुनी यांनी आपल्याकडील मनुष्यबळाचा मुद्दा मांडत त्यांचे भाडे मिळू शकेल काय असा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला पण इतर सर्वांनी तो हासण्यावारी नेत हाणून पाडला.

परराज्यातील वृत्तपत्राने तेथील नव्या आवृत्त्या सुरू करताना तेथील माणसांना कसे फोडले आणि त्यांचे पगार कसे कमी केले याचे रसभरीत वर्णन ऋषि मुनी यांनी करताच ये पी यांनी त्यांच्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. त्याचा अर्थ सर्वांनीच समजावून घेतला. या पार्श्वभूमीवर, तशा स्थितीत ‘सुबह का भूला छह महिने बाद की शाम को घर लौटा’ तर काय करायचे? यावर प्रतिक्रिया आजमावण्याचा प्रयत्न ये पींनी केला. तेव्हा ऋषि मुनी यांनी सुचविलेला तोडगा असा ः ‘सुबहका भूला शाम को लौटता है और उसकी हमको भी जरुरत है तो ले लेना चाहिये। मात्र या वेळी कॉलेज प्रवेशाप्रमाणे प्रेस प्रवेशाच्या वेळी त्याच्याकडून डोनेशन घेता येईल. त्याच्या तेथील पगाराच्या 40 टक्के रक्कम त्यांनी डोनेशन म्हणून संबंधित मालकाकडे जमा करावयाची आणि मागील पगाराच्यापेक्षा 10 टक्के कमी पगारावर काम करण्याची ऑर्डर मिळवायची, कारण सरकारी नोकरीत सुद्धा अशी डोनेशनची प्रथा आहेच, असे त्यांनी जोर देऊन सांगितले. या विषयावर सर्वांचेच एकमत झाले आणि आपापल्या ऑफिसमध्ये चहा मागवून व आपापले बिल स्वतःच चुकवून या कॉन्फरन्सची सांगता झाली. पुढील आठवड्यात श्री. राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे या वेळी ठरविण्यात आले.
हिंदीभाषिकांच्या आक्रमणाविरुद्ध
मराठी वृत्तपत्रांची आघाडी स्थापन
औरंगाबादेत ‘एमएनएस फ्रंट’ची स्थापना ः राज ठाकरे प्रमुख मार्गदर्शक

औरंगाबाद, दि. 7 (आमच्या खास प्रतिनिधीकडून ) ः महाराष्ट्रात होत असलेल्या हिंदी भाषिक वृत्तपत्रांच्या आक्रमणाविरुद्ध एकवटण्याचा निर्णय आज भर दुपारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये घेण्यात आला. महाराष्ट्रातील औरंगाबाद या तिसर्‍या दर्जाच्या शहरात येऊ घातलेल्या एका हिंदी वृत्तपत्रसमूहाच्या मराठी आवृत्तीच्या निमित्तावरून हा गदारोळ उठला असून औरंगाबादमध्ये कार्यरत असलेल्या लोकमत, सकाळ, सामना आणि तरुण भारत या चार दैनिकांनी मिळून ही आघाडी उघडली आहे. ‘मराठी न्यूजपेपर सॉलिसिटेशन फ्रंट’ असे या आघाडीचे नामकरण करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या इशार्‍याकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती असा चर्चेचा सूर या वेळी व्यक्त करण्यात आला. या आघाडीच्या पुढील वाटचालीसाठी मनसे प्रमुख श्री. राज ठाकरे यांची एकतर्फी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणाही या वेळी करण्यात आली.
मध्यप्रदेशातील एका सुप्रतिष्ठित वृत्तपत्रसमूहाचा मराठवाड्यातील औरंगाबाद शहरातून मराठी वृत्तपत्र सुरू करण्याचा इरादा व्यक्त होताच साधारण सहा महिन्यांपुर्वी मराठवाड्यातील वृत्तपत्रसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. शहरात 150 मर्सिडिझची खरेदी झाल्याच्या बातमीमुळे देशभरात खळबळ उडालेली होती. या शहरात भरपूर पैसा आहे या भावनेने या ग्रुपने औरंगाबादेतून आपला सुर्योदय करण्याचे ठरविले होते. ही चाहूल लागताच लोकमतने सर्व दैनिकांमधून माणसे पळवून साठेबाजी करण्याचा एकच सपाटा लावला होता. एकाच वेळी तीन लोकमत काढता येतील एवढा अतिरिक्त भरणा त्यांच्याकडे झाला आहे. या तुलनेत शहरात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या सकाळ या वृत्तपत्राने आपल्याकडील बर्‍याचशा कर्मचार्‍यांना सहजपणे लोकमतच्या हाती लागू दिले. त्यामुळे त्यांच्याकडे मनुष्यबळाची चणचण निर्माण झाली. सामना, तरुण भारत, पुण्यनगरी, (न निघणारा) पुढारी, (संध्याकाळी निघणारा) सांजवार्ता या सर्वच दैनिकांत विविध पदांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी भास्कर ग्रुप येताच त्यांच्याकडे धाव घेतली.
माणसे इतरांना भाड्याने देता येतील का याची चाचपणी 
औरंगाबादच्या मराठी पत्रकारांनी स्वप्नातही कल्पना न केलेले आकडे भास्कर ग्रुपने मान्य करण्यास सुरवात केल्याने त्यांच्याकडील माणसांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला आणि इतर दैनिके ओस पडण्याचा धोका निर्माण झाला. लोकमतचा एकही माणूस घ्यायचा नाही, हा धोरणात्मक निर्णय झाल्यामुळे या ग्रुपमधून आतापर्यंत एकही कर्मचारी तिकडे घेतला गेला नाही. मात्र इतर दैनिकांची कार्यालये ओस पडली.
या पार्श्वभूमीवर लोकमतचे ऋषि मुनी यांच्या निमंत्रणावरून सकाळचे ये पी, सामनाचे भरतमुनी आणि तरुणभारतचे कोणीतरी यांच्यात आज भर दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. लोकसत्ताच्या औरंगाबादच्या प्रतिनिधीला निमंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण प्रेमभंग झालेल्या कॉलेज तरुणाप्रमाणे त्यांची अवस्था झाल्यामुळे ‘तेरी गलियों मे ना रखेंगे कदम, आज के बाद’ हे एकच गाणे ते मागील आठवडाभर गात असल्याचे कळले. त्यांचे सहकारीदत्त म्हणून उपस्थित होण्याच्या प्रयत्नात होते पण बर्दापूरकर यांचा फोन आल्याने ते निघून गेले. त्यामुळे त्यांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना नाही घेतले तरी चालेल, त्यांचे सक्यऊलेशन आहेच तरी किती असा मुद्दा तरुणभारत वाल्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला पण स्वतःचा खप आठवल्याबरोबर ते गप्प झाले. परराज्यातून होत असलेल्या आक्रमणावर या वेळी प्रामुख्याने सर्वांनी मतप्रदर्शन केले. यानंतर या कॉनफ्रन्समध्ये महाजन, दळवी, तुळशी यांनाही सहभागी करून घेण्यात आले. टेलिफोन भवनमधून निघणार्‍या वायरवर आकडा टाकून आम्ही गुप्त कनेक्शन मिळविल्यामुळे आम्हाला ही सर्व बित्तंबातमी कळली. 
या प्रसंगी गांभीर्यपूर्वक चर्चा झाली असली तरी मुख्य आग्रही होते ऋषि मुनी. एवढ्या प्रचंड प्रमाणावर माणसे घेऊन ठेवल्याने त्यांचे पगाराचे बॅलेन्सशीट बिघडत असल्याचे त्यांच्या चेहर्‍यावरून दिसत होते. मधल्या काळात पगारी वाढवून ठेवल्यामुळे तो वाढीव ताण पडलेला आहे. अशा स्थितीत आपली माणसे इतरांना भाड्याने देता येतील का ही चाचपणी करणे हा या कॉन्फरन्सचा हेतू असल्याचे लक्षात आले.
चौघांचा मिळून एकच रिपोर्टर
या पार्श्वभूमीवर - यापुढे शहरातील प्रत्येक बीटवर या चार दैनिकांचा मिळून एकच रिपोर्टर राहणार आहे. काही महत्वाच्या बीटवरून ताणतणावाची स्थिती निर्माण झाल्यास संबंधित एका रिपोर्टरने इतर तिघांच्या हप्तेबंदीची सोय संबंधितांशी सुसंवाद प्रस्थिपित करून पाहावी असे यामध्ये ठरले आहे. सर्व दैनिकांमध्ये येणारी सगळी पत्रके यापुढे एकाच ठिकाणी स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून सामनाच्या कार्यालयात ही पत्रके स्वीकारून तेथेच त्याचे संपादन व अक्षरजुळणी होईल. यामध्ये प्रत्येक ठिकाणी असलेल्या मराठीच्या वेगवेगळ्या पॅकेजचा अडथळा येऊ शकतो ही बाब श्री. महाजन यांनी दृष्टीस आणल्यानंतर श्री. ये पी यांनी तातडीने मॉड्यूलर वाल्यांना फोन लावून सर्व दैनिकांत एकसमान सॉफ्टवेअर बसवून देण्याचे सांगितले. याचे बिल सध्या सकाळ देईल आणि कालांतराने ते इतरांकडून वळते करून घेण्यात येईल असेही ठरविण्यात आले. क्राईम नोट, बाजारभाव, महापालिकेतील घडामोडी, शहरातील राजकारण या आणि अशा प्रकारच्या सर्व बातम्या सर्वच दैनिकांत सारख्याच असतात, त्यामुळे आपण ही बातमी कोठे वाचली होती हेच वाचकांना संध्याकाळी आठवत नसते. त्यांच्या या मर्जीचा कौल मानून बातम्यांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. 
श्री. राज ठाकरे यांच्या इशार्‍याकडे त्याच वेळी लक्ष द्यायला हवे होते असा सूर या वेळी श्री. महाजन यांनी मांडला. त्याला श्री. ये पी यांनी खिन्न मनाने दुजोरा दिला. ऋषि मुनी सुद्धा या प्रसंगी भावनाविवश झालेले दिसले. सामनाशी संबंधित लोकांचा रुमाल नेमका याच वेळी खाली पडल्यामुळे त्यांचे चेहरे टेबलाखाली झाकले गेले. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.
या प्रसंगी पुढील दिशा ठरविण्यात आली असून, वर घेतलेल्या निर्णयाबरोबरच आगामी काळात बचतीचे जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परराज्यातून येत असलेल्या वृत्तपत्राने दिलेले प्रचंड पगार हे सर्वांच्या चिंतेचे मुख्य कारण असल्याचे दिसले. एवढे दिवस छटाक (पगार) घेणार्‍यास थेट आतपाव (पगार) मिळाल्याने त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत तशाच आता आत असलेल्यांच्याही अपेक्षा वाढत आहेत. अशा वेळी काय करायचे हा पेच सर्वांसमोरच उभा असल्याचे दिसले. ये पी यांनी आपण अजिबात पगार वाढवू शकत नसल्याचे स्पष्ट करतानाच वाढवायचेच असले तर किती वाढवावे लागतील याचा कानोसा घेतला. ऋषि मुनी यांनी आपल्याकडील मनुष्यबळाचा मुद्दा मांडत त्यांचे भाडे मिळू शकेल काय असा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला पण इतर सर्वांनी तो हासण्यावारी नेत हाणून पाडला. 
परराज्यातील वृत्तपत्राने तेथील नव्या आवृत्त्या सुरू करताना तेथील माणसांना कसे फोडले आणि त्यांचे पगार कसे कमी केले याचे रसभरीत वर्णन ऋषि मुनी यांनी करताच ये पी यांनी त्यांच्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. त्याचा अर्थ सर्वांनीच समजावून घेतला. या पार्श्वभूमीवर, तशा स्थितीत ‘सुबह का भूला छह महिने बाद की शाम को घर लौटा’ तर काय करायचे? यावर प्रतिक्रिया आजमावण्याचा प्रयत्न ये पींनी केला. तेव्हा ऋषि मुनी यांनी सुचविलेला तोडगा असा ः ‘सुबहका भूला शाम को लौटता है और उसकी हमको भी जरुरत है तो ले लेना चाहिये। मात्र या वेळी कॉलेज प्रवेशाप्रमाणे प्रेस प्रवेशाच्या वेळी त्याच्याकडून डोनेशन घेता येईल. त्याच्या तेथील पगाराच्या 40 टक्के रक्कम त्यांनी डोनेशन म्हणून संबंधित मालकाकडे जमा करावयाची आणि मागील पगाराच्यापेक्षा 10 टक्के कमी पगारावर काम करण्याची ऑर्डर मिळवायची, कारण सरकारी नोकरीत सुद्धा अशी डोनेशनची प्रथा आहेच, असे त्यांनी जोर देऊन सांगितले. या विषयावर सर्वांचेच एकमत झाले आणि आपापल्या ऑफिसमध्ये चहा मागवून व आपापले बिल स्वतःच चुकवून या कॉन्फरन्सची सांगता झाली. पुढील आठवड्यात श्री. राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे या वेळी ठरविण्यात आले.

6 अप्रैल 2011

औरंगाबादी धम्माल...


सध्या औरंगाबादी एकच धम्माल चालू आहे. इलेक्शनच्या काळात जशे पैशे वाटतात तशे तिथे वाटणे चालले आहे म्हणे... रिपोर्टर ? घे 20 हजार. सबएडिटर ? - घे 25 हजार. चीफ रिपोर्टर - घे 30 हजार, चीफसबएडिटर? घे 35 हजार... निवासी संपादक ? घे 75 हजार... काही सांगू नका, नुस्ति चांदी आहे चांदी. भर अब्दुल्ला गुड थैली में...
पण म्हाराजा इकडे दोन माणसांच्या तोडाला फेस आला आहे - येपी आणि आरडी.. 
आमच्याकडे मनात दडून ऐकायचे मशीन आहे. ते मशीन त्यांच्या मनाला आणि आमच्या कानाला लावले की सग्ळे स्पष्ट ऐकू येऊ लागते. 
ते मशीन आम्हीच तयार केलेले आहे. सध्या एकच पीस आहे. तुम्हालाही हवे असेल तर थोडे थांबावे लागेल. नवीन मशीन बनवायला वेळ लागतो आणि वेटिंग खूप आहे. अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, नारायण राणे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे (राजचे नाव आधी घेतले म्हणजे आम्ही मनसेवाले आहोत, असे नाही. अल्फाबेटिकली ‘यू’ आधी ‘आर’ येते) आणि असे 25 जण वेटिंगवर आहेत. खरे तर आम्हाला ‘बेटिंगवर’ म्हणायचे होते. पण व्यवहारात इतके स्पष्ट बोलायचे नसते.
असो.
तर ‘येपी’ आणि ‘आरडी’ यांच्या मनाला आणि आमच्या कानाला ते मशीन लावून आम्ही जे ऐकले ते खूपच मनोरंजक, धक्कादायक, चमत्कारिक... आणखी काय बरे... तर असे जे काही असेल तसे वाटले. काय बरे हे घडले? त्यांच्या मनात काय खळबळ माजली आहे? त्याचा वानोळा खास तुमच्यासाठी -


येपी ः जरा घाई करायला हवी होती राव...
काय करावे काही समजत नाही. या माणसानं जीव बेजार केलाय. काही काम करत नव्हता. नुस्ता बसून काड्या करायचा. कंपूशाही माजविली होती. म्हणून याला काढला. म्हटलं, आता जरा लायनीवर येईल पण कसचं काय? यानं तर औरंगाबादेत उच्छाद मांडला. माझी टीम फोडतोय म्हणे. सूड की काय म्हणे घ्यायचाय त्याला. बघू किती सूड घेतो ते... कधीतरी टाचेखाली येशीलच ना...
परवाच तिथं टीम पाठवली होती. म्हटलं माणसं रोखली पाहिजेत. पण कसचं काय? सगळ्यांनाच पगार वाढवून पाहिजेत. किती वाढवायचे? बरं तिथून इन्कम किती जनरेट होत? सगळी टार्गेट कागदावरच. प्रत्यक्षात कमाई किती? कुणी मराठवाड्यातून आलाय, कुणी तरुण भारतातून, कुणी आणखी कुठून... नुसतं पोसणं चाललंय. तो एक जण होता. ताईच्या काळपासून जाहिरातीचं बघायचा, त्याला चार दीडक्या वाढवून मिळाल्या तर गेला तिकडं. सोबत आणखी दोन तीन जणांना नेलं. कसंबसं एकाला रोखलं. पण याला काही अर्थ आहे? निष्ठा वगैरे काही आहेत की नाही? भले आम्ही निष्ठेचे लोणचे घालू पण यांनी असं सोडायला नको होतं. आमचा कल्याण चांगला. परत बोलावताच तो पळत आला. बरं पगारही थोडा कमीच घेतला. याला म्हणतात निष्ठा.
महाजनांना मी सांगितलं होतं, थोडाफार पगार वाढवूनही देऊ पण सध्या थांबवा. पण पोरं कुठली ऐकतात. आजकालच्या पोरांना धीरच नाही. आता अगदी खरं सांगायचं तर पगार वाढवून देऊ म्हणून मी आजपर्यंत खूप जणांना शेंड्याच लावल्या. ते तरी बिचारे किती दिवस थांबणार म्हणा? 
पण या बाहेरच्यांना इथं कडमडायचं काय कारण? आम्ही तिकडे जातो का? आम्ही इंग्रजी काढला पण इथंच वाटला. तिकडं फिरकलो तरी का? मग? त्यांनी इकडं का यावं? आमची पोरं फोडून नेताहेत. महेष देशमुख, श्रीकांत सराफ, दिलीप वाघमारे, रणजित खंदारे, महेष सरवदे, निरंजन छानवाल, प्रमोद चौधरी, प्रदीप भागवत, मधुकर कांबळे या सगळ्यांना त्यांनी पळवलं म्हणे. पळवू दे. पळवू दे. किती जण पळवतील? पण मला एक प्रश्न पडलाय, हे इतके पगार देऊच कसे शकतात? हिंदीतला पैसा मराठीत वळवणार? आम्ही एवढे दिवस पुण्याचा पैसा औरंगाबादेत वळवत आहोत तसे?
खरं तर या अगरवालांनी माझ्याशी एकदा बोलायला पाहिजे होते. आज माणसं घ्याल पण उद्या जाहिराती कशा मिळवाल? पेपर कसा काढाल? न्यूज प्रिंटचे भाव किती वाढताहेत...बघू. 
यूकेंना सांगितलंय, तिथं नाशकात लोकमतची माणसं फोडता आलं तर बघा. काय पगार वगैरे वाढवून देऊ. औरंगाबादेतही सांगून ठेवलंय. पेपर तर काढायलाच हवा. पगार मिळाला तरी तिकडं जायला बिचकणारी माणसं आमच्याकडे येतील असं वाटतंय तर खरं. पण आजकाल काही सांगता येत नाही. हाच चान्स घेऊन त्यांनी त्यांची माणसं पेरली तर पुन्हा वांधा. त्या अरुणचं कळायला आम्हाला दोन वर्षं लागली. जरा काळजी घ्यायला सांगायला पाहिजे.


आरडी ः मै परमजीतको बोला था
मै परमजीतको बोला था, मत कर. पर किया. अब भुगतो. पापा भी अडे रहे. ऍक्च्युअली चक्रधर अब सब संभाल लेंगा. सगळ्या लोकांना पगार वाढवून दिले. त्या सकाळवाल्यासारखे नुसते वाढवून देऊ म्हणून बोललो नाही. थेट वाढवले. हे येणार असे कळल्याबरोबर सगळीकडची माणसं फोडून काढली. चार आठ लोक इकडे तिकडे जाणारच म्हणून गरजेच्या दुप्पट माणसं भरून ठेवली. म्हटलं बघू कोण कोण जातं. कोणी गेले तरी मला फिकिर नाही. पण मानलं पाहिजे चक्रधरला. फुल्ल टाईट फिल्डिंग लावली. उनके हिसाबसे सबका पेमेंट बढाया. औकात नही थी फिरभी कई लोगोंको बडा किया. अब मुझे टेन्शन नही. पण साला संधू के जगहपे अब कोई अगरवालही चाहिये. हमारे पापाभी बहुत ग्रेट हैं. क्या क्या खेल खेले हैं उन्होंने. सब को सुला दिया था। अब मेरे हाथ पे ये पहलाही चॅलेंज है। कुछ करके दिखाना मंगता है. त्या नई दुनियाच्या अगरवालला बोलावला आहे संधूच्या जागी. हम मारवाडी हुये तो भी क्या हुवा, हम मे भी भेद है. औरंगाबादची अगरवाल कम्युनिटी डिव्हाईड झाली पाहिजे. म्हणून आमच्याकडे पण अगरवाल. देखते है क्या होगा.
पण साला त्यांना पण मानला पाहिजे. त्या सकाळची पूरी वाट लगा दी. आधे हमारे पास आधे उनके पास. चलो. अब खरी टसल हम मारवाडीयोंमेही होगी. कोई भी जीता तो मारवाडीही जितेंगा. 


अशा प्रकारचे मनोगत ऐकून आम्ही दंग झालो. 
तुम्हाला काय वाटते? 
काय होईल?

4 अप्रैल 2011

मुंगीने मेरु पर्वत तर गिळला नाही ना ?

मुंगीने मेरु पर्वत तर गिळला नाही ना? मग लांबून दिव्याची वात पेटवणार कशी? बरे, ना त्यांच्याकडे तेलाचा साठा ना काडीची आग! मग औरंगाबादी प्रकाश पाडण्यास दिवा कसा पेटणार? साक्षात 'भास्करा'खाली भोपाळी गेल्यानंतर म्हणे लांब प्रकाश पडेच ना. आणि तिथे औरंगाबादी तर शेठजींनी चिमणी, कंदील घासून पुसून, लख्ख करून वात घालून तयार ठेवली आहे म्हणे. आता काय करायचे? पेशवाई जेवणावळीत बुडाली म्हणतात. तशी भास्करशाही फाईव्हस्टार जेवणावळीत तर बुडणार नाही ना? बाकी काही असो, पेशवाईत ब्राह्मणांचे भले झाले. दोन टाईम जेवणखाण, वर शिधा आणि दक्षिणेचाही लाभ होत असे. सध्या औरंगाबादी असेच काहीसे घडते आहे. कधी साहित्यिकांना बोलाव आणि तीर्थ देऊन चित्रान्न खाऊ घाल, कधी मान्यवरांना बोलाव आणि तीर्थ देऊन बिर्याणी खिलव, कधी एजन्सीला बोलाव आणि तीर्थ देऊन मॅच दाखव असे प्रकार सुरू आहेत म्हणे. जसजसा दिवा पेटायला उशीर होत आहे तसे तसे होटेलाचे बिल वाढून ‘भोपाळशेट’चा जीव खाली वर होत आहे म्हणतात.

त्यात साक्षात काळीपांढरी दाढीवाल्यांनी आपला अब्राह्मणी अनुभव पणाला लावत कुमारस्वामींच्या साथीने निवडलेल्या माणसाचा प्रकाश लांबपर्यंत पडेचना. यामुळे भोपाळसेठ म्हणे चिंतित झाले आहेत. त्यातच लोकांच्या मताने चालणार्‍या औरंगाबादी सेठजींनी लोकांची मर्जी जाणून साक्षात मोघेगुरुजींनाच पळविले. आता काय करायचे? औरंगाबादी मुदलातच चांगली माणसे कमी. त्यात काळीपांढरीवाल्याला जे लोक चालतात ते फक्त ताटाखालचेच लागतात असे म्हणतात. त्यांच्या लेखी म्हणे ब्राह्मणांचे दोनच प्रकार आहेत. ताटाखालचे आणि कानावरचे. ताटाखालचे ब्राह्मण त्यांना प्रिय आहेत आणि कानावरचे ब्लॅकलिस्टात. म्हणूनच प्राचीन काळी कानावरच्या ‘मोठ्या लोकां’ना दूर ठेवून ताटाखालच्या साक्रीच्या ब्राह्मणाला त्यांनी संपादक केल्याचे ऐकीवात आहे. अर्थात दक्षिणगंगेचे पाणी प्यायलेल्या पैठणच्या हिकमती ब्राह्मणाने आपला जोर लावून संपादकपद एक वर्षाने का होईना मिळविले खरे. अशाच आणखी एका कानावरच्या ब्राह्मणाला काळीपांढरीवाल्याने देशोधडीला लावल्याचेही ऐकीवात आहे. त्यामुळे आता चतुर ब्राह्मण त्याचे नादाला लागत नाहीत. आपण बरे, आपला पगार बरा, आपला पेपर बरा अशी त्यांची नीती आहे.
त्यातच ताटाखालच्या ब्राह्मणाच्या ताटाखाली राहावे लागणेही अनेकांना रुचणारे नाही, असेही ऐकीवात आहे. आणि आता मुळात भोपाळसेठांची गणितेच चुकत आहेत ऐसेही ऐकीवात आहे. औरंगाबादी माणसे मिळेनात, पुणे मुंबईतून तिथे कोणी जाण्यास तयार होईनात. कोब्रासारखे डोळे असणारे आणि काळीपांढरी दाढीवाले अफ्रिदीप्रमाणे उंटावरून शेळ्या हाकत आहेत. खरे तर त्यांनी धोनीप्रमाणे मैदानात उतरून धुतले पाहिजे. पण त्यासाठी टिंब टिंबमध्ये दम हवा ना !

मग भोपाळसेठनी आपल्या पेढीवर कामाला असलेल्या मराठी भाषकांना दोन - पाच हजारांची तनखावाढ देऊन औरंगाबादी पाठवायचे ठरविल्याचे कळते. पण त्यावर औरंगाबादी सेठ दरडावून सांगताहेत म्हणे, की एवढी तनखावाढ घेऊन गाव सोडण्यापेक्षा आमच्याकडून तेवढीच तनखावाढ घ्या आणि आमच्या समाचारासाठी या. तुमच्याच गावात राहा. हे समाचाराचे बोलणे त्यांच्या पचनी पडत असल्याचे आम्ही ऐकून आहोत. बरे, सध्या स्थळकाळवर्तमानाने स्थिती अशी आहे की औरंगाबाद नगरीचा पत्रकार पोळलेला आहे. आज अनुभवी गणले जाणारे सर्व लोक एकेकाळी तीन महिन्यातून एकदा पगार, कमी पगार यामुळे गांजलेले होते. शेटजी आणि मालकांच्या आसर्‍याला आल्यावर बिचार्‍यांच्या घरी महिन्याचा किराणा वेळेत येऊ लागला. खाऊन पिऊन गालावर चमक दिसू लागली. बायकोला सणावाराला साडी घेता येऊ लागली. अशी सिस्टिम लागल्यावर आज दुप्पट पगाराच्या मागे लागून उद्या भोपाळसेठने गादी गुंडाळली तर रोजच्या अन्नाला मोताद व्हायची वेळ. पुन्हा जुन्या वळचणीला कोण बसू देणार? आणि आज जायचेच तर अशी अशी माणसं तिथं दिसताहेत की अशांच्या सोबत काम कसे? बरे, रोज पुण्यातून काळीपांढरीवाल्याच्या करामतींचे किस्से औरंगाबादी बाजारात जाऊन पडत आहेत. त्यामुळे या माणसाचे दाखवायचे रुपडे वेगळे आणि प्रत्यक्षात थोबडा वेगळा असे दिसून येऊ लागले. कुमारस्वामी तर कुणाच्या हाती कधी लागणार?

आता अशा स्थितीत भोपाळसेठने लोकांच्या मताला सुरुंग लावण्यासाठी बत्ती घेऊन शिलेदारांना पाठविल्याचे कळते. मोठ्या हिकमतीने लोकांच्या मतातून माणूस पळवून त्याच्या हाती साक्षात भास्कराचे सुकाणू देण्याची त्यांची स्कीम आहे असे कळते. पण यात यश मिळेल का? काळीपांढरी दाढी जोवर तेथे आहे आणि कोब्र्याचे विष भिनण्याची शक्यता जोवर आहे तोवर सुकाणू त्या दिशेला वळण्याची शक्यता दिसत नाही आणि दुसरे म्हणजे औरंगाबादी सेठची सुकाणूवरील पकड इतकी मजबूत आणि सुकाणूची दिशाही शेठला हवी तशी, अशा स्थितीत भास्कराचे सुकाणू कोणाचे हाती? म्हंजे आता असे होत आहे की जबरदस्त बॅनर, प्रचंड बजेट, दिमाखदार सेट, खतरनाक स्टोरी, अशुतोष गोवारीकर डायरेक्टर आणि हीरो हिरॉईन कोण, तर शायनी अहुजा आणि राखी सावंत...! बाप्पा रे बाप्पा...! प्रोड्यूसर भोपाळसेठ, तुमचे काही खरे नाही !

हे सगळे रामभरोसे बरे चालल्यानंतर, खरे तर आता औरंगाबादी सेठनेही जरा लोकांची मर्जी खरोखरी जाणून घेतली पाहिजे. येवढे दिवस त्यांचे दिवस होते. पण आता कमीतकमी ‘चॉलेंज’ मिळाल्यावर तरी त्यांनी शहाणे झाले पाहिजे. बाबुजींच्या निवडणुकीच्या काळात जसे सारे लोकमतवाले विनम्र असतात तसे नेहेमीच राहिले पाहिजे. जाहिरात नसली तरी बातम्या लावल्या पाहिजे. साडेतीन हजाराची कॅपॅसिटी असलेल्या गारखेड्याच्या संकुलात एपीएल - एएफएलच्या फायनलसाठी साठी 50 हजाराची गर्दी जमल्याची थापेबाजी बंद केली पाहिजे. वानखेडेची वाढलेली क्याप्यासिटी 35 हजाराची आहे हे तुम्हीच छापता आणि ती गर्दी लोकांनी टीव्हीवर पाहिली आहे, त्यामुळे 50 हजार कशाला म्हणतात हे जन्तेला माहिती आहे. आणि तसेही लोक तुमच्या माघारी ‘फेकमत’ अशीच संभावना करतात. हे तुम्हास ठावूक आहे का?

असो. मुद्दा हा की मोठ्या जोराने निघालेला भास्कराचा रथ महाराष्ट्राच्या सीमेवर दलदलीत फसला आहे. बाहेर ओढून काढायचा तर घोडेही मिळेनात. रस्ते आणि दलदलीचा खरा अंदाज नसणारे ‘एसी प्रेमी’ सारथी घेतले की असेच होणार. चालायचेच. सारथी बदला. साथी बदला. चाके बदला. घोडे मिळू शकतील. पण इथेच भोपाळशेटांचे घोडे पेंड खात असेल, तर?
सांज ढले... गगन तले... तुम कितने एकाकी....!