सांप्रतात महाराष्ट्रदेशी प्रचंड चरवीतचरवण (पक्षी - चर्वितचर्वण) चालू आहे. मिडिया सारा देश हलवून टाकू शकतो हे खरेच पण मिडियाचे येणेही देश हलवणारे असते हे आम्ही प्रथमच ऐकले - वाचिले - पाहिले. दिल्लीपासून गल्लीपर्यंत (म्हंजे फक्त म्हणण्यापुरते हो... एरव्ही दिल्लीत मराठी माणसाला कोण पुसतो?) नुस्ती चर्चाच चर्चा. हे इकडे जाणार. ते तिकडे जाणार. ह्यांनी राजीनामा दिला. नाही दिला. उगाच सांगितले. आश्विन लागला. विवेक सुटला. प्रश्न मिटला... हे सग्ळे आम्ही एन्जॉय करीत होतो. कारण याचे खरे साक्षीदार आम्ही आहोत. हे सारे आमच्या समोर, काही ठिकाणी तर आमच्या मध्यस्थीने घडत होते. अनेक जण आम्हाला भेटले. आम्ही अनेकांना भेटलो. आम्ही काही जणांना निरोप पाठविले. काहींनी आम्हाला निरोप पाठविले. काहींनी नुस्तीच हूल उठवली. ज्याला सग्ळे माहिती अस्ते त्याच्यासमोर अशी ‘चंमतग’ चालू असेल तर कित्त्त्त्ती मज्जज्जजा...!
आज हे सारे खरे खरे सांगून टाकण्याची वेळ आली आहे. आदरणीय कुमार केतकर साहेबांची बातमी जाहिर झाली आणि आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त झालो. आता सांगण्यास हरकत नाही, की ‘दिव्य मराठी’साठी संपादकीय मनुष्यबळ शोधण्याची जबाबदारी आमच्यावर टाकण्यात आली होती. (कारण, भास्कर ग्रुपचे सर्वेसर्वा मा. अभिलाष खांडेकर हे इंदुरी. आम्हीही इंदुरी. त्यांनीच आम्हाला ही जबाबदारी सोपविली होती. अधिक माहितीसाठी फेसबुकवरचे आमचे प्रोफाईल पाहा.) सार्या महाराष्ट्रभरातील मिडियाशी आमचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध इथे आमच्या कामी आले आणि माननीय खांडेकर साहेबांनी आमच्यावर ही जबाबदारी टाकली. म्यानेजमेंटची केतकर साहेबांशी गंभीरपणे चर्चा सुरू होती. कारण पूर्ण राज्यात पुढच्या दोन वर्षांत दिव्य मराठीचा विस्तार करायचा आहे. त्याचे प्लानिंग मागचे दोन महिने चालू होते. हे प्लानिंग झाल्यावरच केतकर साहेबांची घोषणा होणार होती. जो पर्यंत केतकर साहेबांच्या नावाची अधिकृत घोषणा होत नाही, तो पर्यंत आम्ही कुठे चकार शब्द काढायचा नाही, अन्यथा जागरणमधून भास्करमध्ये आलेल्या पत्रकारांचे पगार जसे कमी केले तसे आमचेही मानधन कमी करू असा प्रेमळ इशारा आम्हाला लेखी स्वरुपात दिलेला होता. (हे कॉन्ट्रॅक्ट अस्मादिकांसच कैसे मिळाले? आमचे इंदौर कनेक्शन कामी आले. (आमची इंदौर नगरी भली बांका. इंदौरी पाहुणचाराची तोड नाही. खवैयांनी खावे आणि गवैयांनी गावे तर इंदौरमध्येच, ऐसी या नगरीची ख्याती. ‘खाऊवाली गली’ फक्त आमचे इंदौरमध्ये. मनसोक्त खा. नाहीतर तुमचे पुणे... खरे तर आता आमचेही पुणे! ... एक प्लेट मिसळीवर आधी शांपल फ्री मिळायचे. आम्ही तीन तीन शांपल फ्री चापायचो. आता शांपलला पण पैशे मागतात. असो. कुमार गंधर्व पण इंदौरचेच. म्हंजे जवळच्या देवासचे... तर असे आमचे इंदौर कनेक्शन. सध्याचा तारें जमीं पर चा गीतकार स्वानंद किरकिरे पण इंदौरचाच!) तर, सांगण्यास आनंद वाटतो, की ही सिक्रसी मेंटेन करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की भास्करवाल्यांनी प्रत्येक ठिकाणची खडान्खडा माहिती कशी मिळविली? तर ती ही अशी मिळविली -
आम्ही (म्हंजे आदरार्थी एकवचन) गावोगाव (म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद) भास्करच्या खर्चाने फिरलो. आमची राहायची व्यवस्था मात्र फाईव्हस्टारमध्ये नव्हती. आम्ही साध्याच हॉटेलात एसी रुममध्ये राहिलो. एसीत बसून अंदाज बांधणारे आम्ही नाही. मग आम्ही बाहेर पडलो. अनेक जण आम्हाला ओळखतात. आम्ही बहुतेकांना ओळखतो. पण आमची भास्करवाली ओळख मात्र आम्ही दाबून ठेवली. पत्रकार, पत्रक-कार, साहित्यिक, न-साहित्यिक, प्राध्यापक, विचारवंत अगदी सगळ्यांना भेटलो. सखोल माहिती घेतली.
काही ठिकाणी काही जणांना संशय आला. पण आम्हाला संशयाचा फायदा मिळाला. कारण सध्या सगळेच जण चौकशा करीत आहेत. लोकमतवाले सध्या माणसांची साठेबाजी करीत आहेत. (अशी माणसं साठवून झाल्यावर ते पुढे काय करतात, हे महावीरभाई जोंधळेंना विचारायला पाहिजे. त्यान्चा पत्त ‘अक्षर’वाल्याकडे नक्की मिळेल.) सकाळवाल्यांना सध्या कोण महत्वाचं आणि कोण देखाव्याचं हेच कळेनासं झालंय. तिथं जोरदार गळती आहे. पुढारीची नेहेमीप्रमाणे नव्या आवृत्तीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आम्ही नक्की कुणासाठी ‘पात्रसंशोधन’ करतो आहोत, हे नक्की कळत नव्हते. पण अशा स्थितीतही ‘मला सध्याचं सोडायचं आहे’, असं मोघम सांगणारे भेटले. काही जण तर ‘भास्करला जॉईन होता आलं तर बरं होईल’ असा खडा टाकून गेले. काही जणांनी तर ‘आम्हाला भास्करचं बोलावणं आलंय’ हे आम्हालाच सांगून गेले. बिच्चारे... खरे तर आम्ही एकेकाळी याच धंद्याचे पाईक. पण आता आम्ही कंटेंट मॅनेजमेंट करून पोट भरतो.
येक महत्वाची सूचना आम्हास दिली गेलेली होती. येका क्याटागिरीतल्या लोकांचा विचारही करायचा नाही, असे ते कलम होते. जी माणसे अ-विवेकाने वागून ‘मर्जी’ चोरण्याचा प्रयत्न करतात, ज्यांच्या नावावर सहकार्यांच्या पगारांच्या पाकिटांच्या चोर्यांची अनेक प्रकरणे जमा आहेत, जे सहकार्यांची उणीदुणी काढतात, जे लफडेबहाद्दर आहेत पण वरिष्ठांच्या ‘मर्जी’ने त्यांची मनमानी चालते, अशा क्याटागिरीतले लोक टाळावेत असे आम्हाला सांगण्यात आले होते. पण तुर्तास आम्ही त्या कडे दुर्लक्ष केले आहे. एखाद्याचे पोट भरणार असेल तर आम्हि आड येत नाही.
आज आम्ही हे सारे जगजाहिर करणार आहोत. कारण आता कॉन्ट्रॅक्ट संपले. आमचे पूर्ण मानधन आम्हाला मिळाले.
आमच्या कामाचे स्वरुप खालीलप्रमाणे होते -
1) मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद येथे विविध दैनिकांच्या संपादकीय विभागात काम करणार्या लोकांचे गुणांकन करायचे. गुणांकनानुसार शहरवार वर्गवारी करायची. यात संख्येचे बंधन नाही आणि सक्तीही नाही.
2) हे करताना पेपर मोठा की छोटा याचा विचार करायचा नाही.
3) आधी या व्यवसायात असलेले आणि आता नसलेले किंवा आता असलेले पण वैतागलेले लोक शोधायचे. सक्षमपणे काम करीत आहेत, त्यांचा शोध घ्यायचा आणि ते भास्कर ग्रुपला जॉईन होऊ शकतील का किंवा बाहेर पडलेले या व्यवसायात परत येणार का, याची चाचपणी करायची.
4) मोठ्या नावांच्या भानगडीत पडायचे नाही. प्रवीण टोकेकर, पराग करंदीकर, विवेक गिरधारी, यमाजी मालकर अशी छोटी छोटी नावं शोधायची. कारण संपादक तर केतकर साहेब होणार हे नक्की होते. मग खालचा कारभार पाहायला कामाची माणसं नकोत का?
5) ही टेस्टिंग करून या याद्या भास्करच्या सुपूर्त करायच्या.
6) केतकर साहेबांची घोषणा झाल्याशिवाय थेट किंवा सांकेतिक स्वरुपात ही माहिती कोणालाही द्यायची नाही.
यानुसार आम्ही आधी माणसांच्या याद्या तयार केल्या आणि नंतर पुढचे शेरे नोंदवले.
तर या नुसार आम्ही तयार केलेला अहवाल आज आपणासमोर मोडत आहोत. गोड मानून घ्यावा, ही विनंती.
‘भास्कर'साठी मनुष्यबळ व्यवस्थापन नियोजन अहवाल.
सद्यस्थिती ः
अ) महाराष्ट्रात सध्या पत्रकारितेत बुद्धीची दिवाळखोरी माजलेली आहे. सगळे पेपर कमर्शियल झाल्यामुळे पत्रकारही (पत्रकार की पत्रक-कार?) कमर्शियल झाले आहेत. अवैध वाहतुकी, वाळूचे पट्टे, महापालिका, पोलिस खाते, सिंचन विभाग, रस्ते महामंडळ हे या मंडळींच्या आपुलकीचे विषय बनले आहेत.
ब) प्रत्येकाला एक तर संपादक व्हायचं आहे किंवा मग वर उल्लेख केलेल्या बीटचे वार्ताहर. टेबलवर बसून एडिटिंग करायला सांप्रतात कोणी तयार नाही.
क) वरील प्रकारची कामे मिळाल्यास कोणीही पगाराची अट वगैरे घालत नाही. अन्यथा अन्य लोकांच्या सरासरी 30 हजार ते पुढे अशा अपेक्षा आहेत.
नव्या मिडियाकडून अपेक्षा ः
अ) थेट पर्मनंट करावे.
ब) कामाची अट नसावी.
क) इंग्रजीचा आग्रह धरू नये. कारण आम्ही मातृभाषेबद्दल आग्रही आहोत. शिवाय पेपरही मराठीतच निघणार आहे.
ड) ट्रान्सलेशन वगैरेची कामे प्रोमेशनल ट्रान्स्लेटरकडे द्यावीत.
ई) घरात व कार्यालयामध्ये इंटरनेटचा अमर्याद वापर संबंधित दैनिकांच्या खर्चाने करावयास मिळावा. जेणेकरून फेसबुक वगैरेंच्या सहाय्याने जगाच्या संपर्कात राहता येईल.
ठिकठिकाणची काही महत्वाची नावे ः
यामध्ये आम्ही सध्या कार्यरत असलेले किंवा बाहेर पडलेले अशा दोन्ही गटांमध्ये शोध घेतला. सूत्रांद्वारे त्यांची मते आजमावण्याचा प्रयत्न केला. इथे हे कबुल करण्यात आम्हास संकोच वाटत नाही, की ही माहिती आम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, सूत्रांद्वारे, मोघम चर्चा सोडून वगैरे वगैरे सर्व प्रकारच्या मार्गांचा अवलंब करून मिळविलेली आहे.
मुंबई ः
1) आल्हाद गोडबोले. / सध्या - प्रहार. बदल करण्याची शक्यता - शक्य.
2) विवेक गिरधारी. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
3) प्रवीण टोकेकर. / सध्या - लोकप्रभा. बदल करण्याची शक्यता - शक्य. (की-पोस्ट मिळाल्यास)
4) अतुल कुलकर्णी. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य (औरंगाबाद मिळणार असेल तर)
5) मुकेश माचकर. / सध्या - प्रहार. बदल करण्याची शक्यता - शक्य.
6) मनोज गडणीस. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
7) संजीव लाटकर. / सध्या - स्वतंत्र व्यवसाय. बदल करण्याची शक्यता - नाही
8) प्रशांत दीक्षित. / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - शक्य
9) संतोष प्रधान. / सध्या - लोकसत्ता. बदल करण्याची शक्यता - शक्य.
10) राजीव साबडे. सध्या - पुढारी. बदल करण्याची शक्यता - शक्य.
11) समीर मणियार. / सध्या - मटा. बदल करण्याची शक्यता - शक्य.
पुणेः
1) पराग करंदीकर. / सध्या - महाराष्ट्र टाईम्स . बदल करण्याची शक्यता - शक्य. (स्वतःच्या पदासह सारा ग्रुप हलवता आला तरच. सकाळ सोडून कुठेही जाण्याची तयारी.)
2) मुकुंद संगोराम. / सध्या - लोकसत्ता. बदल करण्याची शक्यता - सांगता येत नाही.
3) यमाजी मालकर. / सध्या - अर्थक्रांती. बदल करण्याची शक्यता - शक्य. (पण लायब्ररि चान्गली असावी)
4) निशिकांत भालेराव. / सध्या - युनिक फीचर्स. बदल करण्याची शक्यता - तातडीने.
5) सुनील माने. / सध्या - स्वतंत्र व्यवसाय. बदल करण्याची शक्यता - शक्य. (की-पोस्ट मिळाल्यास)
6) सुनील चव्हाण. / सध्या - स्वतंत्र व्यवसाय. बदल करण्याची शक्यता - शक्य.
7) संजय आवटे. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
8) दीपक मुनोत / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - शक्य.
9) शेखर कानेटकर / सध्या - मुक्त. बदल करण्याची शक्यता - शक्य.
10) नरेंद्र जोशी / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - शक्य.
11) पराग पोतदार. / सध्या -लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
12) वर्षा कुलकर्णी. / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - शक्य. (पुरवणीचे काम मिळणार असल्यास)
नागपूरः
1) प्रवीण बर्दापूरकर. / सध्या - लोकसत्ता. बदल करण्याची शक्यता - शक्य. (औरंगाबाद मिळाल्यास)
2) सुरेश द्वादशीवार. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
3) यदु जोशी. / सध्या - मुंबई लोकमत . बदल करण्याची शक्यता - शक्य (नागपूर मिळाल्यास)
4) श्रीपाद अपराजित. / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - शक्य.
5) धनंजय गोडबोले. / सध्या -मटा नागपूर. बदल करण्याची शक्यता - शक्य.
6) सविता हरकारे. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
7) रुपाली तौलिनकर. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
नाशिकः
1) विश्वास देवकर. / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - सांगता येत नाही.
2) मंगेश वैशंपायन. / सध्या - सकाळ, दिल्ली. बदल करण्याची शक्यता - शक्य (नाशिक िमळणार असेल तर)
3) नंदकुमार टेणी. / सध्या - देशदूत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
4) सुभाष कावळे. / सध्या - मुक्त. बदल करण्याची शक्यता - शक्य.
5) किरण अग्रवाल / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
6) अपर्णा वेलणकर. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
7) मेघना ढोके. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
औरंगाबादः (ग्रुपचे मुख्य सेंटर इथे होणार. केतकरसाहेब मुंबईतच बसणार.)
1) चक्रधर दळवी. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - सांगता येत नाही. (अख्खा ग्रुप घेऊन जाण्याची क्षमता, पण मालकाच्या अत्यंत विश्वासातले.)
2) जयंत महाजन. / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - नाही.
3) दत्ता जोशी. / सध्या - स्वतंत्र व्यवसाय. बदल करण्याची शक्यता - कमी. (सहा आकडी पगार मिळाल्यास शक्य)
4) प्रमोद माने. / सध्या - लोकसत्ता. बदल करण्याची शक्यता - शक्य.
5) गणेश तुळशी. / सध्या - सामना. बदल करण्याची शक्यता - शक्य.
6) धनंजय लांबे. / सध्या - सामना. बदल करण्याची शक्यता - शक्य. (पगार वाढवून मिळाल्यास)
7) अनिल फळे. / सध्या - स्वतंत्र व्यवसाय. बदल करण्याची शक्यता - शक्य. (पण फारसा उपयोग नाही)
कोल्हापूरः
1) वसंत भोसले. / सध्या - पीपल्स पॉलिटिक्स. बदल करण्याची शक्यता - सांगता येत नाही.
2) राजा माने. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
3) दशरथ पारेकर. / सध्या - तरुण भारत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
4) जयसिंग पाटील. / सध्या - मुक्त. बदल करण्याची शक्यता - शक्य.
5) विजय जाधव. / सध्या - सकाळ. बदल करण्याची शक्यता - शक्य.
6) बाबुभाई येरवाडे. / सध्या - लोकमत. बदल करण्याची शक्यता - नाही.
7) समीर देशपांडे. / सध्या - तरुण भारत. बदल करण्याची शक्यता - शक्य.
(वर उल्लेख केलेली नावे आम्ही आमच्या सर्व प्रकारच्या सोअर्सेसमधून मिळविली आहेत. यदाकदाचित एखादे उत्तम नाव आपल्या माहितीत असेल, तर कृपया आमच्या ई मेलवर आम्हाला ते कळवावे म्हणजे आमच्या अहवालाच्या पहिल्या परीशिष्टात आम्ही त्यांचाही समावेश करू. शेवटी, कर्ते करविते ‘करा’न्त - म्हणजे खांडेकर, केतकर असे लोक आहेत. आम्ही फक्त भारवाही......!)
याशिवाय, बाकी राज्यभरातील छोट्यामोठ्या अशा 157 नावांची यादी आम्ही केतकर साहेबांकडे दिली आहे. त्याची सीसी खांडेकर साहेबांकडेही पाठविली आहे. ही यादी आम्ही पुढील आठवड्यात जाहिर करू. अगदी नक्की.
चलो, बाय.
भेटत राहू.