हिन्दी भाषिकांचे आक्रमण थोपविण्यासाठी अखेर लोकमत - सकाळ आघाडी आज बुधवारी स्थापन करण्यात आली. या बाबत आजवर फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा सुरु होती. आज यावर अंतीम निर्णय झाला. या अंतर्गत बरेच काही ठरले असल्याचे कळते.
अंतिम निर्णयानंतर सर्वांनी औरंगाबाद - जालना रोडवर केंब्रिज स्कुल समोर असलेल्या काळे यांच्या धाब्यावर सामिष भोजनाचा आस्वाद घेतला. यात दिनकर रायकर, उत्तम कांबळे, चक्रधर दळवी, विवेक गिरिधारी, जयंत महाजन यांच्यासह आणखी काही प्रमुख लोक उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती लवकरच मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे.