बोरुबहाद्दर सर्वांचाच मित्र आहे. कोणावर वैयक्तिक टीका करणे हा आमचा उद्देश नाही. आमच्या टिंब टिंब मध्ये दम सुद्धा आहे. आमचे नाव गोपनीय ठेवणे ही आमची भूमिका आहे. आमचे नाव आम्ही १ जानेवारी २०१२ रोजी जाहीर करणारच आहोत. पण आमच्या काही वाचकांना मात्र आपली ओळख दडवून शेरेबाजी करण्याची खुमखुमी आलेली दिसते.
खरे तर त्याने निनावी मेल पाठ्वत केतकर - कुबेर यांच्या संबंधात पाठविलेले कात्रण पाहताच आम्हास त्याची ओळ्ख पटली होती. तरी आम्ही ते पत्र प्रकाशीत केले. याला दम लागतो तसेच मोठे मन सुद्धा लागते. पण त्यानेच पुन्हा एकदा निनावी मेल पाठवून कोणाची अकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही त्याला रोखले. आम्ही आमचा प्रतिक्रियांचा कॉलम बंद केला असला तरी आमचा इ मेल दिलेला आहेच. त्यावर प्रतिक्रियांचे स्वागत आहे. पण हा मेल त्यांच्या नावाने आला पाहिजे. त्यांची ओळख गुप्त ठेवण्याचे वचन आम्ही दिलेले आहेच. ते आम्ही पाळू. पण कोणाची अकारण बदनामी चालणार नाही.
’आमचा हा ब्लॉग खर्डेघाशी करणार्या समस्त बोरुबहाद्दरांना समर्पित आहे. स्थळकाळसाधनपरत्वे आम्ही तुर्तास फक्त ‘पत्रकार’ आणि ‘साहित्यिक’ या दोनच जमातींसाठी या कट्ट्यावरील जागा देण्याचे ठरविले आहे. चटकदार काही घडावे, तर ते याच जमातींमध्ये, येवढेच आमचे अनुमान ! टेक इट ईझी... वाचा, विचार करा, सोडून द्या..” ही आमची भूमीका आम्ही आधीच स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे याकडे गम्मत म्हणून पाहावे. कोणा एकाला टार्गेट करण्याचे आम्हाला कारण नाही. आम्ही प्रत्येकालाच प्रसाद देण्याचे ठरविले आहे. ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू.
त्यावर काही प्रतीवाद असेल तर अवश्य कळवा. पण स्वत:च्या इ मेल वरून. निनावी नव्हे ! बातमीदार हा ब्लॉग आमचे प्रेरणास्थान आहे. आमची लिन्क दिल्याबद्दल त्यांचे आभार...
सर्वांचाच पण कोणाचाच नसलेला -
- बोरु बहाद्दर